Abdul Sattar and Sadabhau Khot : हातकणंगले शिवसेनेचेच; अब्दुल सत्तार कडाडले

Hatkangale Loksabha Constituency : सदाभाऊ खोत यांची मागणी सत्तारांनी फेटाळली...
Sadabhau Khot, Abdul Sattar
Sadabhau Khot, Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News :

लोकसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांच्या जागांवर दावे-प्रतिदावे करीत आहेत. याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचा मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हातकणंगलेच्या जागेवर दावा सांगितला आहेत. यापूर्वी ही जागा शिवसेनेकडे होती आणि सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असलेले खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी या जागेवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे आता हातकणंगलेच्या (Hatkanangale Loksabha constituency) जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

Sadabhau Khot, Abdul Sattar
Rajiv Gandhi : ...त्यामुळे राजीव गांधी सरकारने देखील 63 खासदारांचे केले होते निलंबन...

गेल्या निवडणुकीत आमची हक्काची असलेली जागा शिवसेनेला दिली होती. आता ती जागा आम्हाला परत द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना ती देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्या ठिकाणी शिवसेनेचे धैर्यशील माने हे तरुण आणि कर्तव्यदक्ष खासदार असून अत्यंत उत्तम काम करीत आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी दावा केला तरी ती जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेचीच राहणार असल्याचे सत्तार यांनी ठणकावून सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आठवडेबाजार बंद करण्यात आलेत यावरून सदाभाऊ खोत यांनी पणन खात्यावर टीका परत सत्तार यांना लक्ष्य केले होते. त्याला उत्तर देताना सत्तार म्हणाले, कोणाचे मार्केट बंद केले, कोणाचे चालू केले, याबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी बोलूनच मी उत्तर देईल. मात्र, कोणत्याही मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या मालाचे पैसे 24 तासांत देण्याचे काम आम्ही केले आहे.

एक रुपयांमध्ये पीक विमा हा निर्णयदेखील माझ्या कार्यकाळामध्येच झाला. विम्याबाबतदेखील मोठा निर्णय मी मंत्री असताना घेतला, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याअगोदर मला सदाभाऊ खोत यांच्या परवानगीची गरज नाही, असे सत्तार म्हणले .

(Edited by Avinash Chandane)

R...

Sadabhau Khot, Abdul Sattar
Sharad Pawar : शरद पवारांच्या सभेत चर्चा ‘बनवाबनवी’मधील धनंजय मानेंची... नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com