‘बारामती ॲग्रो’ला आदिनाथ भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाची ७ जूनला सुनावणी

बँकेच्या १२८  कोटी कर्जापैकी  ५० कोटींची साखर विक्री केली असून ते पैसे बॅँकेकडे जमा करण्यात आले आहेत.
Adinath Sugar Factory
Adinath Sugar FactorySarkarnama

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेला  स्थगिती देण्यात आली असून  ता. ३१ मे रोजी झालेल्या सुनावणीत ता. ७ जून ही तारीख देण्यात आली आहे . त्यामुळे या तारखेला न्यायालय काय निर्णय देणार, याची उत्सुकता लागली आहे . (Hearing on decision to lease Adinath to Baramati Agro on June 7)

Adinath Sugar Factory
'विधान परिषदेबाबत मला कोणाचीही ऑफर नाही'

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा मागवण्यात आली हाेती . यात ‘बारामती ॲग्रो’ला आदिनाथ कारखाना २५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.  मात्र, भाडेतत्त्वावरचा करार अद्यापही पूर्ण झालेला नसल्याने  आणि आदिनाथ कारखाना  भाडेतत्त्वावर देण्यास विरोध करणारी  याचिका  पुण्याच्या डीआरडी कोर्टात कारखान्याकडून दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सुनावणीत काय निर्णय होणार, यावर आदिनाथचे भवितव्य ठरणार आहे.

Adinath Sugar Factory
नवनीत राणांविरोधात अमरावतीमधून लोकसभा लढवणार का? खुद्द प्रणिती शिंदेंनीच दिले उत्तर...

आदिनाथ काखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी याबाबत सांगितले की  आदिनाथ सहकारी साखर कारखाना  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने  भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बँकेच्या १२८  कोटी कर्जापैकी  ५० कोटींची साखर विक्री केली असून ते पैसे बॅँकेकडे जमा करण्यात आले आहेत. सध्या साखर विक्री सुरु असून  आणखी साधारणपणे तीस ते बत्तीस कोटींची साखर विकली जाणार आहे . त्यामुळे उर्वरित कर्जाचे हप्ते बँकेने पाडून दिल्यास कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे आम्ही कारखान्याच्या कर्जाचे हप्ते पाडून देण्याची मागणी करत आहोत.

Adinath Sugar Factory
‘शिंदेंनी उजनीहून पाईपालाईन आणली अन्‌ सोलापूरकर पुढील २०० वर्षे तेच पाणी पिणार आहेत’

राज्य बॅंकेची भूमिका अशी कशी?

सध्या २८६८ रूपये  क्विंटलने साखर विक्री सुरू आहे. डीआरडी कोर्टाने  जो जास्त दर देईल, त्या व्यापाऱ्यास साखर देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कारखाना प्रशासनाने साखर विक्रीचे टेंडर केले आहेत. त्याच्यात २९१०  रुपये दराने साखर देण्याचे टेंडर आले आहे. या २९१० रुपये दराने साखर  इतर व्यापारी घेण्यास तयार आहेत . हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आम्ही कळवले आहे . मात्र, बँकेकडून जास्त दराने साखर विक्री  करण्याच्या टेंडरला सहमती दिली जात नाही . उलटपक्षी २८६८  रुपयाने साखर विक्री केली जात आहे, त्यामुळे कारखान्याला साठ ते सत्तर लाख रुपये तोटा सध्या होत आहे . नेमके बँकेची भूमिका अशी का,  याचे कोडे आम्हालाही उलगडत नाही . याशिवाय कामगारांना पगार करण्यासाठी क्विंटलमागे १५०  रु पये देण्याचा निर्णय झालेला असतानादेखील अद्यापही कामगारांना त्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया बँकेकडून केली जात नाही . सध्या बँकेकडून आमच्यावर प्रचंड अन्याय होत आहे , अशी भूमिका आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com