नवनीत राणांविरोधात अमरावतीमधून लोकसभा लढवणार का? खुद्द प्रणिती शिंदेंनीच दिले उत्तर...

काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक अमरावतीमधून लढवावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती.
Navneet Rana-Praniti Shinde
Navneet Rana-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे (Congress) शिर्डीत राज्यस्तरीय चिंतन शिबिर पार पडले. त्या शिबिरात प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक (LokSabha Election) अमरावतीमधून (Amravati) लढवावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे केली होती. त्यावर आमदार शिंदे यांनी प्रथमच भाष्य करत मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात आमदार प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढविणार का, प्रश्न गुलदस्त्यातच राहिला आहे. (Will Lok Sabha contest against Navneet Rana from Amravati? Praniti Shinde gave the answer)

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदे यांनी आज (ता. ४ जून) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले. शिर्डीतील काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर याबाबतची चर्चा सुरू झाली होती. खुद्द प्रणिती शिंदे यांनीच त्यावर भाष्य केले.

Navneet Rana-Praniti Shinde
‘शिंदेंनी उजनीहून पाईपालाईन आणली अन्‌ सोलापूरकर पुढील २०० वर्षे तेच पाणी पिणार आहेत’

शिंदे म्हणाल्या की, मी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार ही काही लोकांनी पसरवलेली अफवा आहे. त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही. आमच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली असेल तर मला ते माहिती नाही.

Navneet Rana-Praniti Shinde
फडणवीसांचा सोलापूर दौरा रद्द; मुंबईकडे रवाना; चर्चेला उधाण!

काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराबाबत कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, देशव्यापी चिंतन शिबाराच्या धर्तीवर राज्यस्तरीय शिबीर आयोजित केले होते. त्याच धर्तीवर आता जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या ९ ते १४ जून दरम्यान जिल्हास्तरीय चिंतन शिबीर होणार आहेत.

Navneet Rana-Praniti Shinde
महाविकास आघाडी झाल्यास आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार!

ज्या राज्यात आमचे सरकार आहे. तिथे प्रलंबित नोकरी भरती करणे, मुलींना सायकल वाटप करण्यावर आमचा भर असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 50 टक्के युवकांना किंवा 50 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. कॉंग्रेस रस्त्यावर आहे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहोत, असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com