Pusesawali Riots : पुसेसावळी दंगलप्रकरणी भाजप नेत्याच्या अडचणी वाढणार; आरोपपत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Vikram Pawaskar Pusesawali Riots : इस्लामपूर आणि विटा पोलिस ठाण्यात पावसकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु यात पोलिसांनी पुढील तपास केला नाही.
Vikram Pawaskar Pusesawali Riots
Vikram Pawaskar Pusesawali Riotssarkarnama

Pusesawali Riots : पुसेसावळी (जि. सातारा) येथील जातीय हिंसाचार प्रकरणी भाजपचे नेते विक्रम पावसकर यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी पुढील चार आठवड्यांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते, न्यायमूर्ती श्‍याम चांडक यांनी दिले आहेत. याप्रकरणी येथील काँग्रेस कार्यकर्ते शाकीर तांबोळी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

इस्लामपूर आणि विटा पोलिस ठाण्यात पावसकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु यात पोलिसांनी पुढील तपास केला नाही. तसेच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी शासन मंजुरी नसल्याचे कारण सांगत आरोपपत्र दाखल झाले नव्हते. त्यानंतर शाकीर तांबोळी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यावर सांगली पोलिसांनी Police आरोपपत्र तयार असून पुढील कार्यवाहीसाठी शासन मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे शपथपत्र सादर केले होते. त्या अनुषंगाने सरकारी वकील वेणेगावकर यांनी चार आठवड्यांची मुदतीची विनंती केली. ती मान्य करीत न्यायालयाने वरील आदेश दिले.

Vikram Pawaskar Pusesawali Riots
Amol Mitkari News : काही तासांतच मिटकरींचा यू टर्न! आता म्हणाले, अजितदादांना महायुतीत मानाचं स्थान, प्रकाश आंबेडकरांनी..!

दरम्यान, सातारा Satara जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दंगलीत धार्मिकस्थळावर झालेल्या हल्‍ल्यात निरापराधाचा तरुणाचा बळी गेला होता. तांबोळी यांनी राजकीय दबावाखाली पोलिस कारवाई करीत नाहीत. गुन्हेगार मोकाट असून पुराव्यांशी देखील छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. या हत्याकांडाच्या फेरतपासासाठी एसआयटीकडे त्यांची मागणी आहे.

Vikram Pawaskar Pusesawali Riots
Video Maratha Reservation : बिहारमध्ये 15 टक्के आरक्षण रद्द, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे काय होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com