Amol Mitkari News : काही तासांतच मिटकरींचा यू टर्न! आता म्हणाले, अजितदादांना महायुतीत मानाचं स्थान, प्रकाश आंबेडकरांनी..!

Amol Mitkari On Ajit Pawar And Mahayuti : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष महायुतीचा एक घटक आहे असल्याचेही मिटकरी यावेळी म्हणाले.
Ajit Pawar and Amol Mitkari
Ajit Pawar and Amol MitkariSarkarnama

Amol Mitkari News : लोकसभेतील अपयशाचं खापर महायुतीत एकमेकांवर फोडणे सुरू आहे. महायुतीत अजित पवारांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोपही केला जात आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजितदादांना महायुतीत एकटे पाडले जात असल्याचा दावा करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांसोबत जावं असं विधान करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अडचणीत आल्यानंतर आता मिटकरींनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे स्पष्ट करत यू-टर्न घेतला आहे.

विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आज मिडिया आणि सोशल मीडियावर माझ्या विधान मोडून तोडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचा वक्तव्याचा विपर्यास केला.

मिटकरी म्हणाले, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने काही पत्रकार बांधव माझ्याशी बोलायला आले होते. त्यावेळी त्यांनी महायुतीबाबत काही प्रश्न विचारले. ऑर्गनायझरमुळे आमच्यात काही मतभेद- मनभेद झालेही असतील पण पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो आहोत. महायुतीत आमचं स्थान भक्कम आहे. भाजप आणि शिवसेना यांनी सुध्दा अजितदादांना मानाचं स्थान दिलं आहे. केंद्रातसुध्दा दादांना मानाचं स्थान आहे. एक राज्यसभा आणि एक विधानपरिषद देऊन आमचं महायुतीत सन्मानाचं स्थान महायुतीत आहे.

यावेळी पत्रकारांनी दुसरा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी जर आपल्यासोबत आली तर काय भूमिका असेल असा सवाल केला.यावेळी मी त्यांना म्हणालो, जसा काँग्रेस पक्षाने वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तसाच काँग्रेस आणि महाविकास आघाडीने वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा देखील यांना सुध्दा मानाचं स्थान दिलं नाही.महाराष्ट्रात आंबेडकरांचं फार मोठं स्थान आहे.आणि ते जरी भाजप किंवा शिवसेनेच्या विचाराशी सहमत नसतील तरीसुध्दा अजितदादांसोबत आले तर महायुती भक्कम होईल.

यामुळे मागास वर्गाला सुध्दा मानाचं स्थान मिळेल आणि बाळासाहेबांचं राज्याच्या राजकारणातलं स्थानही अढळ राहील.या भावनेतून मी ते वक्तव्य केले आहे.बाळासाहेबांसारखा एक मोठा नेता महायुती सोबत जोडला गेला तर निश्चितच ती आम्हा सगळ्यांसाठी आनंदाची बाब असेल.महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अजूनही एक घटक आहे असल्याचे मिटकरी यावेळी म्हणाले.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते..?

समाजकारणात मी बाळासाहेबांना मानत आलो आहे.फुले-शाहू-आंबेडकरांचे वारसदार बाळासाहेब आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा एकत्र यावेत,अशीच माझी वैयक्तिक इच्छा आहे. हा सर्वार्थाने वरिष्ठांचा निर्णय आहे.आंबेडकर चळवळ राष्ट्रवादी सोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि पुढील राजकारण फार वेगळं असेल,असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.

मिटकरी म्हणाले, मागील काही घटना बघितल्या तर अजितदादांना एकटे पाडण्याची प्रयत्न दिसतो. मात्र, महायुतील काही घटक पक्षांनी असे प्रयत्न करू नयेत. कोणी यावं आणि काही बोलावं हे खपवून घेतले जाणार नाहीत.

प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) येण्याचा निर्णय हा सर्वाथाने वरिष्ठांचा निर्णय असेल. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांना आदर्श मानत आलोय.तर, राजकारणात अजितदादांना आदर्श मानत आलोय.आंबेडकरी चळवळ आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल,असे देखील मिटकर यांनी ठणकावून सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com