Solapur Politics : भर सभेत फिरवली नंगी तलवार; धनंजय देसाईंवर गुन्हा दाखल होणार?

Dhananjay Desai Again In Controversy : हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई पुन्हा वादात सापडले आहेत...
Solapur News
Solapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur Latest News In Marathi : हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांचे सोलापुरात जोरदार भाषण झाले. धनंजय देसाई यांनी व्यासपीठावर नंगी तलवार दाखवून भाषण सुरू केले. यापूर्वीही शहरात हिंदू गर्जना मोर्चात राष्ट्रवादीचे महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांनी हातात तलवार घेऊन हवेत फिरवली होती. त्यावेळी त्यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Solapur News
CM Eknath Shinde News : भक्ती-शक्ती संवाद यात्रा महाराष्ट्रात क्रांती घडवेल..!

धनंजय देसाई यांनी जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल (24 डिसेंबर) रात्री भर सभेत नंगी तलवार दाखवली आहे. जेलरोड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होणार की नाही, याकडे आता लक्ष लागले आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सोलापूर शहरात रविवारी रात्री हिंदू गर्जना सभा झाली. या सभेला हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई सभेला उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंदू गर्जना सभेची जाहिरात जवळपास महिनाभरापासून सुरू होती. सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील मैदानावर रविवारी रात्री हिंदू गर्जना सभा झाली. धनंजय देसाईंचे भाषण ऐकण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापुरातील हिंदू राष्ट्र सेनेचे शहरप्रमुख रवी गोणे यांनी धनंजय देसाई यांना भाषण सुरू करण्याआधी तलवार दिली. यानंतर देसाई यांनी भर सभेत नंगी तलवार हवेत फिरवली.

जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदू गर्जना सभा झाली. जेलरोड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सभेत बंदोबस्तासाठी तैनात केले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही धनंजय देसाई यांनी नंगी तलवार फिरवत भाषण सुरू केले.

Edited by Sachin Fulpagare

Solapur News
Solapur Politics : सोलापूरचे दोन्ही देशमुख एकत्र आले; पण सुभाषबापूंचा 'तो' उल्लेख विजय देशमुखांना खटकला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com