सहा लाखांत घरे हे देशासाठी 'रोल मॉडेल' : नितीन गडकरी

मंत्री गडकरी म्हणाले, चरेगांवकर यांनी सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले आहे.
Shekhar charegaonkar, Nitin Gadkari
Shekhar charegaonkar, Nitin Gadkarikarad
Published on
Updated on

कऱ्हाड : मी सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला ते जमलं नाही, ते काम शेखर चरेगांवकर यांनी करुन दाखवले आहे. पाच -सहा लाखांत सर्वसामान्यांना त्यांनी घरे देऊन प्रधानमंत्री आवास योजनेचीही जोड दिली आहे. असे प्रकल्प देशातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात तयार करुन लोकांचे जीवन सस्टीनेबल करता येईल. त्यासाठी हा प्रकल्प 'रोल मॉडेल' ठरले, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

विंग येथील श्रीकृष्ण व्हॅलीमधील सहा लाखांमध्ये घर या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ६० घरांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच घरांच्या चाव्या केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते श्रीकांत कांबळे, संजय पाटील, रामेश्वर रोडे, व्यंकटेश वाघमारे व भगवान वरेकर या घरमालकांना प्रदान करण्यात आल्या. तत्पुर्वी ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सर्व सोयींनी युक्त जागा व उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी श्रीकृष्ण व्हॅली या प्रकल्पात व्यावसायिक जागा असणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

Shekhar charegaonkar, Nitin Gadkari
'नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात कुठेही नाही' : संजय राऊत 

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, कऱ्हाड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, शौकन (विठ्ठल) चरेगावकर यांच्यासह शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, चरेगांवकर यांनी सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले आहे. या प्रकल्पात त्यांनी करमणुक, मनोरंजन, खेळा, प्रबोधन, प्रशिक्षणाचीही सोय उपलब्ध करुन दिली आहे. हा प्रकल्प श्रीमंतासाठी नसुन गरीबातील गरीब माणसांसाठी आहे. असे देशातील प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात खेड्यात तयार व्हावे. त्यातुन ग्रामीण लोकांचे जीवन बदलुन लोकांचे जीवन सस्टीनेबल होईल. ना नफा-ना तोटा या तत्वावर हा प्रकल्प तयार करुन देशात राबवण्यासाठी आराखडा तयार करावा, असेही त्यानी सुचवले.

श्री. चरेगावकर म्हणाले, देशातील प्रत्येकाला स्वतःचे परवडणारे घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने केलेली एक कृती म्हणजे हा प्रकल्प आहे. ग्रामीण भागात नवे व्यवसाय सुरु व्हावेत, तरुण वर्गास रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग सुरु व्हावेत, यासाठी त्यांना या प्रकल्पात घरे व जागा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील युवकांकडे उत्तम क्रीडा कौशल्य असते, पण त्यांना ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सरावास आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात. याचीच दखल घेवून या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे टर्फची निर्मिती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com