अमित शहांबरोबर अक्कलकोटच्या आमदाराचा होम टू होम प्रचार!

कल्याणशेट्टी हे अक्कलकोटमधील ३५ पेक्षा जास्त कार्यकर्ते सोबत घेऊन मेहनत घेत आहेत.
Amit Saha-Sachin Kalyanshetti
Amit Saha-Sachin KalyanshettiSarkarnama

अक्कलकोट : गोव्याची (Goa) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जसजशी अंतिम टप्यात येते आहे, तसतशी मोठी चुरस दिसून येत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे भाजप प्रभारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांना गोव्याच्या प्रचार मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्यांच्यावर मये या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. कल्याणशेट्टी हेही ती जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांनी बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत मये मतदारसंघात ‘होम टू होम’ असा प्रचार केला. (Home to home campaign of Akkalkot MLA with Amit Shah in Goa!)

Amit Saha-Sachin Kalyanshetti
गोव्यानेच माझ्या पंतप्रधानपदाचा पाय रचला : पर्रिकरांची आठवण काढत मोदींची साद

आमदार कल्याणशेट्टी हे गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अनेकदा गोव्याला जाऊन आठवडाभर थांबून भाजपची स्थिती व प्रचार यंत्रणा भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वेळी सहा ते सात कार्यकर्ते सोबत नेऊन त्यांनी प्रचारावर भर दिला आहे. शेवटच्या टप्यात अक्कलकोट येथील पंचवीस युवा कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात होम टू होम प्रचार, छोट्या मोठ्या सभा घेणे, गोव्यातील कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना सक्रिय करणे, प्रचारात नवनवीन कल्पना वापरणे, प्रत्येक बूथनिहाय आपले दोन कार्यकर्ते नेमून त्याची यंत्रणा कार्यान्वित करणे. स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन प्रचाराचा वेग वाढविणे, आदी बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Amit Saha-Sachin Kalyanshetti
महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार; अजितदादा त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार!

आता प्रचाराचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आपल्याला दिलेल्या जबाबदारीत कुठली उणीव राहू नये, यासाठी स्वतःला झोकून देऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ‘होम टू होम’ प्रचार करण्याची संधी आमदार कल्याणशेट्टी यांना मिळाली आहे. कल्याणशेट्टी हे अक्कलकोटमधील ३५ पेक्षा जास्त कार्यकर्ते सोबत घेऊन मेहनत घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com