मलिकांनी सांगितलं, `समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच असंही कनेक्शन!`

मंत्री नवाब मलिक यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप
Sameer Wankhede, Nawab Malik
Sameer Wankhede, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात `हायड्रोजन बाॅंब` फोडण्याचा इशारा दिला आणि त्यांनी खोट्या नोटांच्या प्रकरणातील आरोपीला रियाझ भाटीला फडणविसांचा आशिर्वाद होता, असा खळबळजनक आरोप केला. रियाज भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस असल्याचे सांगत त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो कसा आला, असा सवाल त्यांनी विचारला.

Sameer Wankhede, Nawab Malik
हायड्रोजन बाँम्ब : मुख्यमंत्री काळात फडणवीसांचा खोट्या नोटांच्या रॅकेटना आशीर्वाद

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फडणवीस यांचे संबंध होते. गेली चौदा वर्षे वानखेडे हे मुंबईत कसे, असा सवाल त्यांनी विचारला. वानखेडे यांच्यामार्फत मुंबईत खंडणीचे रॅकेट चालविले जात होते, असा आरोप त्यांनी पुन्हा केला. मलिक यांनी खोट्या नोटांचे प्रकरण हे 8 ऑक्टोबर 2017 मध्ये रोजी उघडकीस आल्याचे सांगितले. या दिवशी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजिन्स (DRI) यांच्यामार्फत छापा मारण्यात आला. त्यात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या खोटा नोटा पकडण्यात आल्या. प्रत्यक्षात या नोटा केवळ 8 लाख 80 हजार रुपयांच्या असल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्यात आले. खोट्या नोटांचे प्रकरणाचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे, तेव्हा ते डीआरआयला होते. खोट्या नोटांची कारवाई केली तेव्हा वानखडे यांच्या मदतीने फडणवीसांनी हे प्रकरण दाबले होते, असा आरोप त्यांनी केला.

वानखेडे हे गेल्या 14 वर्षापासून मुंबईत कसे असा सवाल करत त्यांना फडणविसांचे संरक्षण असल्याचा आरोप केला. माझी लढाई ही एनसीबीतील चांडाळ चौकटिच्या विरोधात आहे. वैयक्तिक कोणाच्या विरोधात नाही. पण वानखेडेंना वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुढे येत आहेत. ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांची अनेक बाबी मला माहीत आहेत. वरळीत दोनशे कोटी रुपयांचा बेनामी फ्लॅट कसा घेतला आहे, याची माहिती मी पुढे देईन. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या माझ्यावर आरोप करत असल्या तरी त्यांना मी उत्तर देणार नाही. त्यांची कृती ही `चोर मचाये शोर`, अशी आहे. ड्रगच्या धंद्यातून आलेल्या पैशावर गाणे म्हणणे चालते का, असाही सवाल मलिक यांनी विचारला.

फडणवीस यांच्या काळात गुंडांना संरक्षण मिळाले असल्याचे सांगून त्यांनी याबाबत आपण वेळ आली तर गृहखात्याकडेही तक्रार करू, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com