तेव्हा ५७ लाख वाटले; पण गणपतराव देशमुख गटाला हिसका दाखवला

सांगोला साखर कारखाना बंद पडण्याला मीदेखील तितकाच जबाबदार आहे.
Sahaji patil
Sahaji patilSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्येक सभासदाला तीन-तीन हजार रुपये वाटले. त्या काळात ५७ लाख रुपयांचे वाटप केले, मतदारांना मासे-मटणाच्या पार्ट्या दिल्या, विमानाने माणसं आणली आणि त्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते (स्व.) गणपतराव देशमुख गटाला हिसका दाखवला. कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. मीदेखील तितकाच पापी आहे, अशी जाहीर कबुली कारखान्याचे माजी अध्यक्ष, आमदार शहाजी पाटील यांनी देत शेतकऱ्यांची माफीही मागितली. (I am also responsible for the closure of Sangola sugar factory: Shahaji Patil)

सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. त्यावेळी शहाजी पाटील यांनी आपल्या पापाची जाहीर कबुली दिली. ते म्हणाले की, सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, मोहिते पाटील गट आणि गणपतराव ऊर्फ आबासाहेब देशमुख यांची ताकद एकीकडे, तर दुसरीकडे मी आणि माझा धाकटा भाऊ. मी आबासाहेबांकडे गेलो आणि दोन-चार माणसं आमची घ्या. आपण कारखाना बिनविरोध करून टाकू, अशी विनंती त्यांना केली. त्यावर आबा म्हणाले की, आता वेळ निघून गेली आहे, दीपक साळुंखे यांना विचारल्याशिवाय होणार नाही. त्यावर मीही ‘दाखवतो तुम्हाला आता’ असे म्हणून तेथून निघून आलो.

Sahaji patil
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना ठार मारण्याची धमकी; शिरूरमध्ये खळबळ

त्यानंतर असा झटका केला की दिल्ली, लुधियाना, हरियाणा येथून लोक घेऊन आलो. एका मताला तीन-तीन हजार रुपये दिले. कट्ट्यावरून ५७ लाख रुपये वाटून टाकले. रात्रीत माणसं (कारखान्याचे सभासद) उचलली. कोल्हापूरच्या महादेवराव महाडिक यांच्याकडे १७०० सभासद नेवून ठेवले. कोल्हापुरात नऊ दिवस माणसं संभाळली. दररोज खायला मासं-मटण्याच्या पार्ट्या आणि पत्ते खेळण्यासाठी पैसेही पुरविले आणि करा एकदाची ऐश, असं त्यांना सांगितलं. कोल्हापुरातील प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक यांच्यासह सर्व नेत्यांवर एक एक जेवणाची जबाबदारी सोपवली आणि मी सांगोल्याला निघून आलो, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Sahaji patil
इंदापूरची जनता कोणाची झोप उडविणार...हर्षवर्धन पाटील की दत्तात्रेय भरणे?

इकडं सांगोल्यात गणपराव देशमुख आणि दीपक साळुंखे यांनी माझ्याविरोधात आमची माणसं उचलून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांना म्हटलं की शेकापची दोन आणि दीपक साळुंखे यांची दोन माणसं घ्या. तुम्ही यादी द्या, मी माणूस बोलवतो. तो माणूस मला उचलून आणलं आहे, असं जरा म्हणाला तर तुम्ही लगेच परत घेऊन या. पण, तो माणूस मी स्वतःहून आलो आहे, असं म्हणाला तर तुम्ही हात लावायचा नाही, अशी ताकीदही दिली, असा किस्सा त्यांनी आपल्या भाषणात सांगून टाकला. आमदार शहाजी पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे कारखाना का बंद पडला, याचे उत्तर ही उपस्थितांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आपोआप मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com