जामखेड ( जि. अहमदनगर ) - जामखेड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ( I got a chance to make the dream of Gopinath Munde come true )
मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकीर्तीचा चा जीवनपट उपस्थितांसमोर विशद केला त्यांच्या राजकारणातील चढ-उतार व कठीण प्रसंग विशद केले .त्यांच्या या भावनिक भाषणाने उपस्थितीत ही भारावून गेले. या प्रसंगी कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रतिष्ठानचे विश्वस्त काशिनाथ ओमासे, शिवाजी डोंगरे ,संदीप ठोंबरे, लहू डोंगरे, बापू राख, अॅड. प्रवीण सानप, माऊली गोपाळघरे आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, "लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची मला संधी मिळाली; ऊस तोडणी कामगार महामंडळाची स्थापना करून ऊस तोडणी कामगारांच्या मुलासाठी संत भगवान बाबा वस्तीग्रह नावाने पहिलं वस्तीग्रह कर्जत - जामखेड मध्ये सुरू करण्याचं भाग्य लाभलं याचा मला सार्थ अभिमान आहे," असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले.
मंत्री मुंडे पुढे म्हणाले की, " स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात आयुष्यभर संघर्ष केला. त्याकाळात मी सावलीसारखा त्यांच्या सोबत राहिलो. तोच संघर्षाचा माझ्याही वाट्याला आला.आमच्या कुटुंबाच्या जणूकाही संघर्ष पाचवीलाच पुंजले आहे. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण व्हावी ऊस तोडणी कामगारांना न्याय मिळावा; याकरिता आयुष्यभर मुंडे साहेब प्रयत्नशिल राहिले. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची संधी मला मिळाली. ऊस तोडणी कामगार महा मंडळाची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आणि राज्यातील पहिलं ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठीच वस्तीग्रह आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात सुरू करण्याची संधी मिळाली यापेक्षा भाग्याची गोष्ट दुसरी नाही," असे त्यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार म्हणाले ," लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात असते तर राज्याच्या व देशाच्या राजकारणातील पातळी एवढी खालावली नसती. मुंडे - पवारांच्यात वैचारिक मतभेद होते. मात्र समाजाच्या हितासाठी ते अनेकदा एकत्र येत होते . ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न त्यांनी एकत्रित येऊन सोडविले होते. त्यांच्या प्रयत्नामुळेच राज्यात 2014 ला सत्तांतर होऊन भाजपचे सरकार येईल आणि गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होतील, असे वाटत होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांनीही गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित काही घटना विशद केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश दिवटे यांनी केले. संदीप ठोंबरे यांनी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.