Chandrakantdada On Sharad Pawar : कुठलीही निवडणूक नसताना मी पावसात भिजलो; चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला

Solapur Chandrakant Patil Tour : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाच्या अगोदरपासून सोलापुरात वादळी वारे सुटले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच एका बाजूचा मंडप फाटला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर वादळात डोक्यावरील मंडपही वाऱ्याने उडून फाटला.
Sharad Pawar-Chandrakant Patil
Sharad Pawar-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 July : कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसताना ही पावसात भिजलो आहे, असे सांगून सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नाव न घेता टोला लगावला. शरद पवारांनी 2019 च्या निवडणुकीत सातारा येथील शेवटची सभा भरपावसात घेतली होती.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाच्या अगोदरपासून सोलापुरात वादळी वारे सुटले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच एका बाजूचा मंडप फाटला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर वादळात डोक्यावरील मंडपही वाऱ्याने उडून फाटला. त्यामुळे चंद्रकांतदादांना पावसात भिजावे लागले.

आई प्रतिष्ठान, सोलापूर आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सोलापूरमधील सेटलमेंट ग्राउंडवर कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यानंतर माध्यमाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पवारांना हा टोला लगावला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमावेळी जोरदार वादळी वारे आल्यामुळे मंडप फाटला. फाटलेल्या मंडपातच चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रम पूर्ण केला. पाऊस आल्यामुळे चंद्रकांतदादांना पावसात भिजतच भाषण करावं लागलं. फाटलेल्या मंडपात आणि भर पावसात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमात भिजले होते.

ते म्हणाले, राज्य सरकारने महिलांसाठी आणलेल्या चार मोठ्या योजनांबद्दल आभार मानण्यासाठी पावसातही कार्यक्रम करा, अशी इच्छा महिलांची होती, त्यामुळे मी भिजलो तर काय फरक पडेल, म्हणून मी पावसातही कार्यक्रम केला. या भटक्या समाजातील महिला आणि पुरुषांनी जे विविध ठिकाणी यश मिळविले आहे, त्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.

राज्य सरकारने चार मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यात महिलांना महिन्याला 1500 रुपये, दरवर्षी तीन सिलिंडर मोफत, महिलांना रिक्षा व्यवसायाठी अर्थपुरवठा, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, म्हणजेच व्यावसायिक कोर्सेसचे फी सरकार भरणार, लेक लाडकी योजनेतून मुलींना जन्मापासून लग्नापर्यंत एक लाख देणार. महिला बचत गटांना कमी व्याजदाराने कर्ज अशा विविध योजना सरकारने आणल्या आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com