Raju Khare : ‘चुकून मला तुतारी हाती घ्यावी लागली’; राजू खरेंचे पुन्हा धक्कादायक विधान, पवारांच्या पक्षात मन रमेना!

Solapur DPC Meeting : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची आज (ता. 30 जानेवारी) नियोजन भवनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक झाली. त्या बैठकीत आमदार राजू खरे यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले आहे.
Raju Khare
Raju KhareSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 January : पंढरपूरमधील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ‘हा तुतारीवाला नुसता नावाला आहे, असे विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या संदर्भात खळबळजनक विधान केले आहे. त्यावरून आमदार खरे यांचे मन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमत नसल्याचे दिसून येत आहे. कारण डीपीसीच्या बैठकीत ‘चुकून मला तुतारी हाती घ्यावी लागली,’ असे वक्तव्य केले आहे, त्यामुळे आमदार खरेंच्या मनात काय चाललंय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीची (Solapur DPC) आज (ता. 30जानेवारी) नियोजन भवनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक झाली. त्यात बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील (ऑनलाईनद्वारे), आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार दिलीप सोपल, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणाले, चुकून मला तुतारी हाती घ्यावी लागली. मी तुमच्यासोबत 35 वर्षे होतो, असे विधान पुन्हा एकदा केले. या वेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘समोर पत्रकार आहेत,’ असे लक्षात आणून दिले. तरीही आमदार खरे आपल्या विधानावर ठाम राहत ‘पुढे पत्रकार असेल तरी असू द्या,’ असे वक्तव्य केले.

Raju Khare
Solapur DPC Meeting : अवैध वाळूउपशावरून पालकमंत्री गोरे आक्रमक; ‘वाळूतस्करांवर कारवाई करा; अन्यथा जिल्ह्यात नोकरी...’

आमदार राजू खरे यांनी पंढरपूर येथील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ‘हा तुतारीवाला नुसता नावाला आहे. राज्यातील सत्तासुद्धा आपलीच आहे. ती सत्ता माझ्या माणसांसाठी निश्चितपणे येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडेही माझी तेवढीच पत आहे. एकनाथ शिंदेंकडेही तेवढीच पत आहे. महाराष्ट्रातील मी एकमेव नशिबवान शिवसैनिक आहे, असा दावाही त्यांनी केला.

Raju Khare
Solapur News : आमचा काय छळ करायचा तो करा; आम्ही आता शांत बसणार नाही; पवारांच्या आमदाराचा इशारा

दरम्यान, राजू खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीसंदर्भात दोन दिवसांच्या अंतरात दोन वेळा धक्कादायक विधाने केली आहेत, त्यामुळे राजू खरे यांचे मन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रमेना का, अशी चर्चा मोहोळ तालुक्यात रंगली आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनीही खरे यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले. मात्र, त्यांच्या या विधानांमुळे त्यांचाही भ्रमनिरास होण्याचीच शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com