Jaykumar Gore Warning : जयकुमार गोरेंचा सूचक इशारा : सुषमा अंधारेंना ब्रिफिंग कुठून झालंय, त्यांच ब्रिफिंग मला झालंय; बालाजी सरोवरचे कॅमेरे चेक करा

Sushma Andhare's Allegation : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून पक्षांतर्गत विरोधकांना सूचक इशारा दिला. ‘जो आपल्या मार्गात येतो, त्याला सोडत नाही,’ असे म्हणत गोरे यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 August : ‘हम किसी के रास्ते में जाते नही. जो अपने रास्ते में आते है, उसे छोडते नही.’ आणि सुषमा अंधारे यांना ब्रिफिंग कुठून झालं आहे, त्याचं ब्रिफिंग मला झालेलं आहे, असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत भाजपमधील नाराज गटानेच आपल्याला ही माहिती दिली आहे, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यावर उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी हा इशारा कोणाला दिला आहे, याची चर्चा रंगली आहे.

हॉटेल बालाजी सरोवरच्या पाचव्या मजल्यावर काय होत होतं. याचे तुम्हीही साक्षीदार आहात. तुम्हीही त्या ठिकाणी होता, तुमच्यासोबत त्या ठिकाणी काय काय झालं. बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे. त्यातील एकही मिनिट शुटिंग काढलेले नाही. त्यामुळे आपण बालाजी सरोवरच्या पाचव्या सुटच्या समोरचं शुटिं एकदा बघा. त्यात काही शंकास्पद वाटलं तर त्यावर काळजी घ्या.

अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या. पण मी तसा आहे, याचा अनुभव त्यांना कधी आला. या सर्व गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत. त्यामुळे ब्रिफिंग व्यवस्थित झालं पाहिजे. मी आयुष्यात कधीही चुकीचं वागत नाही. कारण जयकुमार गोरेंनी चुकीचं काय केलं नाही. त्यामुळे बारामती दमलेली आहे. पण एवढाही सहज नाही की कोणीही मोडून टाकावा. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची आहे.

जयकुमार गोरेंनी माझ्या आरोपांना उत्तर दिलं, तर पुढचा एपिसोड मी रिलिज करेन, असेही अंधारे यांनी म्हटलं होतं, त्यावर गोरे म्हणाले, जयकुमार गोरे हा सामान्य कुटुंबातील रेशन दुकानदाराचा मुलगा आहे. गेल्या २० वर्षांत चार वेळा निवडून आलेला आहे, जनतेने मला निवडून दिलं आहे. मी कुणाच्या मेहेरबानीवर, सुपारीवर राजकारण करत नाही. सामान्यांच्या हिताचं राजकारण मी करतो, प्रस्थापितांच्या विरोधात लढून मी इथपर्यंत आलो आहे.

Jaykumar Gore
Shivratna Controversy : ‘शिवरत्न’च्या वादात पालकमंत्री गोरेंची उडी : 'सगळ्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या नावाचं कम्पल्शन कशासाठी?'

माझा लढा पवार कुटुंब व इतर कुटुंबासोबत झालेला आहे. मी जे भोगलं आहे, ते राजकारणात कोणीही भोगलं नाही. मी परिस्थितीतून राजकारण केलं आहे, कदाचित माझ्यामध्ये ती क्षमता नसती तर माझ्यासारखे अनेक राजकारणी जे क्षमता असूनही प्रस्थापितांसमोर टिकू शकले नाहीत. त्यामुळे ते राजकारणातून संपले आहेत. मी लढाई करून इथपर्यंत आलो आहे, असेही गोरे यांनी नमूद केले.

१५ गुन्ह्यात निर्दोषत्व सिद्ध

ते म्हणाले, माझ्यावर १८ गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मंत्री झाल्यावरही मला सोडलं नाही, ज्याला कोणी बघितलं नाही, अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर १८ गुन्हे दाखल होते, त्यातील १५ गुन्ह्यात निर्दोषत्व सिद्ध झालेले आहे. तीन गुन्हे माझ्यावर चालू आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. त्याचा जो काही निकाल येईल, तो मी स्वीकारेन, असेही त्यांनी नमूद केले.

माझ्यामुळे सातारा, सांगली, पुण्यातील अनेकांची अडचण

गोरे, म्हणाले, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक लोकांना आज जयकुमार गोरेंची अडचण झालेली आहे. सुषमा अंधारे माझ्या भगिनी आहेत, त्यांच्या विरोधात मी कधीच काही बोलणार नाही, त्याही सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आहेत. सामान्य कुटुंबातील माणूस जेव्हा राज्यात मंत्री होतो, तेव्हा हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत. त्या बुद्धीवंत आहेत, असं त्या म्हणतात, त्यामुळे त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे.

Jaykumar Gore
Mohite Patil : ‘शिवरत्न’च्या वादात मोहिते पाटलांची एन्ट्री; म्हणाले, ‘...तर आम्हाला आनंद होईल’

ब्रिफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का?

आपलं ब्रिफिंग वस्तुस्थितीला धरून आहे की नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मी कधीही कुणाच्या वाट्याला जात नाही. मी कधीही कुणाचं वाईट केलेले नाही. त्यामुळे कारण नसताना डिवचायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे सोलापूर शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील किंवा सातारचे असतील, त्या सर्वांना माझी सूचना आहे. मी कधीही कोणाचं वाईट करत नाही आणि विनाकारण त्रास दिला तर मी उत्तर द्यायलाही मी करत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com