Shivratna Controversy : ‘शिवरत्न’च्या वादात पालकमंत्री गोरेंची उडी : 'सगळ्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या नावाचं कम्पल्शन कशासाठी?'

Jaykumar Gore Statement : सोलापूर जिल्हा परिषदेतील ‘शिवरत्न’ सभागृहाचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण करण्याच्या भाजपच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही यावर भाष्य केले.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 August : सोलापूर जिल्हा परिषदेतील दुसऱ्या मजल्यावर शिवरत्न नाव बदलून ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह असे करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने केला आहे. त्यावर जिल्ह्यात सध्या वादळ उठले आहे. त्या वादावर आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले आहे. त्यातून नवा उद्‌भवण्याची शक्यता आहे.

गोरे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेत नामांतरावरून वाद नाही. सभागृहाचे नाव बदलण्याचा विषय होता, सदस्यांनी तो बहुमताने घेतला आहे. बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे, अशी लोकशाहीत प्रक्रिया आहे, त्यामुळे त्याचे राजकारण न करता आपल्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत. त्यावर आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे त्यावर वादळ काही येणार नाही.

शंकरराव मोहिते पाटील यांचे नाव कसं पुसलं जाईल. मोहिते पाटील यांचं नाव प्रत्येक गल्लीला, बोळाला, रस्त्याला... कुठल्या ह्याला त्यांचं नाव नाही. एवढ्या सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कम्पल्शन कशासाठी पाहिजे. त्यांचाही आम्हाला कधी अवमान करायचा नाही. त्या गोष्टीत मला जायचं नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

गोरे म्हणाले, आम्ही शंकरराव मोहिते पाटील यांचं नाव बदललेले नाही. आम्ही ते बदलणारही नाही. आम्ही ‘शिवरत्न’ हे नाव बदलेले आहे. ते नाव बदलण्याचा निर्णय मीही घेतलेला नाही. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदस्यांनी बहुमताने तो निर्णय घेतला आहे, हे मला तुमच्या माध्यमातून समजलेले आहे.

Jaykumar Gore
Mohite Patil : ‘शिवरत्न’च्या वादात मोहिते पाटलांची एन्ट्री; म्हणाले, ‘...तर आम्हाला आनंद होईल’

शिवरत्न हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी जोडले जात आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यावर गोरे म्हणाले, आता कुठलंही नाव जोडणे संयुक्तिक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण बघितलेला आहे, तो जिल्हा परिषदेच्या पाठीमागच्या बाजूला आहे. या लोकांनी महाराजांचा पुतळा पाठीमागे बसवणं उचित नव्हतं. तो दर्शनी बाजूला आणि पुढच्या बाजूला बसविण्याची आवश्यकता होती, असेही गोरेंनी सुनावले.

Jaykumar Gore
Hiraman Khoskar : आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाकडून जिवे मारण्याची धमकी ; शिवसेना तालुका प्रमुखाची थेट पोलिसांत तक्रार, महायुतीतच पेटला वाद

ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या सन्मानाविषयी कुणी बोलावं, हा वेगळा विषय आहे. त्यावर मी जाणार नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. महाराजांच्या नावाला काळिमा लागेल, असं कोणतंही कृत आम्ही करणार नाही आणि कुणाला करू देणार नाही. त्यामुळे हा विषय आणि तो विषय वेगळा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com