भाजपच्या लोकसभेच्या तयारीत प्रदेश उपाध्यक्षांनाच वगळले; समर्थकांमध्ये नाराजी

Satara|BJP : प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा बॅनरवर फोटो अन् नावही नाही...
BJP Satara, Narendra Patil Latest News
BJP Satara, Narendra Patil Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आणि पूर्व तयारी करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य, उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश (Somprakash) सातारा (Satara) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भाजपा (BJP) प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) मतदारसंघातील असूनही त्यांना वगळण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नेते या दौऱ्यात सहभागी असताना नरेंद्र पाटील यांना सामावून न घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. (BJP Satara, Narendra Patil Latest News)

BJP Satara, Narendra Patil Latest News
दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; केसरकर म्हणाले, मुंबईत अनेक मैदाने...

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी केंद्रातून केंद्रीय राज्यमंत्री सोमप्रकाश यांना पाठवले आहे. ते तीन दिवस सातारा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अनेक ठिकाणी मेळावे आणि इतर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व मोठे नेते या दौऱ्यात असून त्यांचे फोटोही सर्व बॅनरवर लावण्यात आले आहेत. मात्र या सगळ्यात नरेंद्र पाटील कुठेही दिसंत नाहीत. नरेंद्र पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यानी मागील लोकसभा युतीच्या माध्यमातून लढली होती. मात्र तरीही त्यांचा कुठेही उल्लेख होताना दिसंत नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

BJP Satara, Narendra Patil Latest News
धोका असलेल्या घरांची यादी तयार करा, मुख्यमंत्री सहायता निधीतून १० हजार मिळणार!

दरम्यान, भाजपने देशातील १४४ लोकसभा मतदारसंघावर २०२४ च्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. यामुध्ये राज्यातील १६ लोकसभी मतदारसंघाचा समावेश असून त्यामध्ये साताऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांच्या दौऱ्यात नरेंद्र पाटलांना वगळले जात असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र नाराजी दिसत आहे. बॅनरवर फोटो अन् नाव नसल्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com