सुजय विखे पाटलांनी रोहित पवार, नीलेश लंकेंना मारला टोमणा, म्हणाले...

भाजपने ( BJP ) काल ( सोमवारी ) कर्जतमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादीचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर जोरदार टीका केली.
sujay vikhe
sujay vikheSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात कर्जत नगर पंचायतचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी भाजपने ( BJP ) काल ( सोमवारी ) कर्जतमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादीचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर जोरदार टीका केली. Sujay Vikhe Patil scolded Rohit Pawar, Nilesh Lanke, said ...

कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व मित्रपक्षांतर्फे मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले या वेळी झालेल्या जाहीर सभा झाली. या प्रसंगी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, युवा नेते सुवेंद्र गांधी, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सरचिटणीस सचिन पोटरे, सह निरीक्षक बाळासाहेब महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, शहराध्यक्ष वैभव शहा आदी उपस्थित होते.

sujay vikhe
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करण्याचे बाळकडू माझे आजोबा लोकनेते बाळासाहेब विखे यांच्याकडून मिळाले आहे. मात्र राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कुणी दबाव आणि दहशतीचे राजकारण करीत असले तर त्यांचा माज उतरवू. ही निवडणूक माझ्या वा राम शिंदेंच्या प्रतिष्ठेची नसून कर्जतकरांच्या विश्वासाची आणि स्वाभिमानाची लढाई आहे, असे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. खासदार डॉ. विखे पाटील उपहासात्मकपणे म्हणाले, जिल्ह्यात दोन नाही तर सहा मंत्रीपदे देऊन अहमदनगर जिल्ह्याला राज्याची राजधानी घोषित करावी. गरज पडली तर नगरमध्ये एखादे मंत्रालय देखील बांधता येईल, असा खोचक टोला विखे यांनी लगावला.

sujay vikhe
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

ते पुढे म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारची कामगिरी जनता पाहात आहे. दोन वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे भाजपला पारनेर आणि कर्जत अशा दोनही मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे. कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत राष्ट्रवादीत गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र विरोधकांचा अजून उमेदवारच ठरला नाही. रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याबद्दल जर जनतेला विश्वास वाटत असेल तर त्यांच्या उमेदवाराला निवडून द्यावे. मात्र त्यामुळे भविष्यात पश्चताप करण्याची वेळ येऊ शकते अशी टीका त्यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकत्र येणार नाहीत. मात्र निवडणूक झाल्यावर एकत्र येतील जनतेने यांचा ढोंगीपणा लक्षात घ्यावा. हे सरकारच मुळात स्वार्थासाठी एकत्र आले आहे. ते आपसात भांडत असून, मूळ मुद्द्यापासून दूर पळतात. राज्यात वीजबिल, कोरोना, शेतकरी अनुदान असे अनेक प्रश्न आहेत. मात्र यातील एकही प्रश्न राज्य सरकारला मार्गी लावता आला नसल्याची देखील टीका त्यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com