Pawar Vs Shinde : मी एकनाथ शिंदेंना जाब विचारणार : अजितदादांचे आव्हान

नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला स्वतःचाच निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बदलला आहे.
Ajit Pawar News in Marathi, NCP News, CM Eknath Shinde News in Marathi,
Ajit Pawar News in Marathi, NCP News, CM Eknath Shinde News in Marathi, सरकारनामा

Pawar Vs Shinde : पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या प्रभागरचना आणि प्रभागनिहाय सदस्य संख्या निश्चित करण्याबाबतचा नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला स्वतःचाच निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बदलला आहे. शिंदे यांनी स्वत:च निर्णय का बदलला, याचा जाब शिंदे यांना विधानसभेत विचारणार असल्याचे राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी शनिवारी (ता.13) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अजित पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, आमदार अशोक पवार, बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते.

Ajit Pawar News in Marathi, NCP News, CM Eknath Shinde News in Marathi,
महाविकास आघाडीतील धुसफूस टोकाला : अजित पवार, जयंत पाटील मातोश्रीवर

पवार म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकासमंत्री होते. त्यांनीच नगरविकास मंत्री या नात्याने पुण्यासह राज्यातील महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा आणि प्रभागनिहाय सदस्य संख्येबाबतचा मसुदा तयार केला आणि मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. तोच मसुदा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजूर केला होता. शिंदे यांनीच तयार केलेला हा मसुदा शिंदे यांनीच मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलला आहे. पण हा बदल कशासाठी, याचा जाब त्यांना विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. त्यामुळे शिंदे यांना विधानसभेत याचा जाब विचारणार आहोत."

राजकीय फोडाफोडी करून स्थापन केलेले राज्य सरकार हे सर्वसामान्य मतदारांना न पटलेले आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदार सरकारबाबतची नाराजी मतपेटीतुन व्यक्त करतील. सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे सव्वामहिना दोघांचेच मंत्रीमंडळ राहते. सव्वा महिन्यानंतर विस्तार झाल्यानंतरही अद्याप खातेवाटप होत नाही, हे दुर्दैव आहे.

Ajit Pawar News in Marathi, NCP News, CM Eknath Shinde News in Marathi,
TET EXam Scam : तर नव्याने शिक्षक भरती होऊ शकते: अजित पवार

'विकास पाहण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांचा बारामती दौरा'

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, "बारामतीच्या विकासकामांबाबत अनेकांना उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध केंद्रिय मंत्र्यांनी आतापर्यंत बारामतीला येऊन येथील विकास पाहिला आहे आणि कौतुकही केले आहे. हा विकास पाहण्यासाठी सितारामन येणार असतील तर त्यांचे मी बारामतीचा लोकप्रतिनिधी म्हणुन स्वागत करतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com