महाविकास आघाडीतील धुसफूस टोकाला : अजित पवार, जयंत पाटील मातोश्रीवर

Shivena| Congress| NCP| शिवसेनेने मित्रपक्षांना विश्वासात न घेता विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केली.
Shivena| Congress| NCP|
Shivena| Congress| NCP|
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले.आघाडी सरकार कोसळल्यानंतर आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही धुसफूस सुरू झाली आहे. शिवसेनेने (Shivsena) परस्पर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याने काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीनेही नाराजी व्यक्त केली आहे. तर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. यामुळे काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आणि लगेचच त्यांनी दानवे यांच्या नावाची घोषणाही केली. त्यात कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनीदेखील आक्षेप घेतला.

Shivena| Congress| NCP|
शपथविधीनंतर मुनगंटीवार यांचे प्रथम आगमन; कार्यकर्त्यांनी अशी केली स्वागताची तयारी...

शिवसेनेने मित्रपक्षांना विश्वासात न घेता विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केली. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या या आक्षेपानंतर काँग्रेसचा दावा अद्याप कायम असल्याचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडी एकत्र असताना शिवसेनेने परस्पर विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यांच्या उमेदवाराचे नाव देणे, हे चुकीचं आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचे पत्र देण्यापूर्वी त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हणाले. तर महाविकास आघाडीत एकोपा राहावा अशीच आमची अपेक्षा आहे, असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. या दरम्यान, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत, राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com