मी शिवसेना सोडणार नाही

मी लढवय्या कार्यकर्ता आहे, लढतच राहणार आहे.
 Sujit Minchekar
Sujit Minchekarsarkarnama
Published on
Updated on

कुंभोज (जि. कोल्हापूर) : मी शिवसेना (shivsena) सोडून कोठेही जाणार नाही. मी लढवय्या कार्यकर्ता आहे, लढतच राहणार आहे. शिवपुरी ते बाहुबली रस्त्यासाठी दोन कोटी निधीची उपलब्धता करून या रस्त्याचा प्रश्न निकाली लावू, असे मत माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर (Sujit Minchekar) यांनी व्यक्त केले. (I will not leave Shiv Sena : Dr. Sujit Minchekar)

नेज येथे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांच्या प्रयत्नातून मंजूर विकासकांमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरपंच दीपाली गोंधळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद सदस्य यादव म्हणाले, ‘नेज-शिवपुरी गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पेयजल योजना मंजूर झाली आहे. या योजनेसाठी एक कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल.’

 Sujit Minchekar
कोल्हापूरसाठी गूड न्यूज : कार्गो वाहतूक सेवा सुरू होणार

माजी पंचायत समिती सदस्य बी. जे. पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब गारे, सरपंच दीपाली गोंधळी, उपसरपंच मनोज कांबळे, सदस्या ज्योती नेजकर यांनी मनोगत व्यक्त केले. अर्जुन चव्हाण, दीपिका पोवार, पांडुरंग कुंभार, अशोक नेर्ले, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. ग्रामसेविका वैजयंती कोळी यांनी स्वागत केले. प्रणाली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विद्या चव्हाण यांनी आभार मानले.

 Sujit Minchekar
राजकारणात हिंमत दाखवावी लागते म्हणत शिवसेनेने उचकवले पर्रीकरांच्या मुलाला!

जुगलबंदी रंगलीच नाही

कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीने गावातील सर्वच पक्षांच्या गटनेत्यांना एकाच व्यासपीठावर आणले होते. यामुळे राजकीय टोलेबाजी होणार, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. मात्र, गटनेत्यांनी विकास कामांवरच बोलणे पसंत केल्याने राजकीय जुगलबंदी रंगलीच नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com