Local Body Elction : मँचेस्टर नगरीत शिवसेना ठरणार भाजपची डोकेदुखी, महायुतीचा निर्णय आज शक्य

Ichalkaranji Municipal Corporation Elections : आगामी महापालिकाकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना देखील जाहीर झाली आहे. आता आरक्षणाचा मुद्दा फक्त राहिला असून ते जाहीर होताच इच्छुकांकडून प्रत्यक्ष मोर्चे बांधणीला सुरूवात होईल.
Local Body Elction DCM Eknath Shinde And CM Devendra Fadnavis
Local Body Elction DCM Eknath Shinde And CM Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला.

  2. महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

  3. महायुतीकडून मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे.

  4. भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी शिवसेनेने तब्बल 35 जागांवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

  5. महायुती संदर्भात उद्या भाजपच्या उच्चस्तरीय मंत्र्यासोबत चर्चा होणार आहे.

Kolhapur News : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने सुरवातीपासून व्यूहरचना आखण्यास सुरुवात करून एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र शिवसेनेचा खासदार अन् भाजपचा आमदार असतानाही महायुतीकडून अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे महायुतीच्या राजकीय वर्तुळात अजून शांतता आहे. भाजपकडून स्वबळाचा नारा दिला असला तरी शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून तब्बल 35 जागांवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यामुळे महायुती न झाल्यास भाजपचे टेन्शन शिवसेनेमुळे वाढविण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यासोबत महायुती संदर्भात उद्या चर्चा होणार आहे.

लोकसभा, विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडी एकसंधपणे सामोरे जात आहे. त्यासाठी आघाडीकडून व्यूहरचना आखली जात आहे. दर बुधवारी काँग्रेस भवनात बैठक घेऊन महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली जात आहे. संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडी मजबूत नसली तरी त्यांच्याकडून नियोजनबध्द कार्यक्रम आखला जात आहे. त्यांचा महायुतीकडून उमेदवारी न मिळणा-यावर डोळा आहे. त्याचाही चाचपणी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे.

Local Body Elction DCM Eknath Shinde And CM Devendra Fadnavis
Local Body Election : एकछत्री कारभाऱ्यांचे पॉकेट तोडले, हक्काचे भाग जोडले, मात्ताबरांच्या 'या' प्रभागात राजकीय घमासान

दुसरीकडे महायुती होणार काय, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. भाजपचा स्वबळाचा नारा अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीवेळी भाजप व शिवसेना यांचे स्वतंत्र स्वागत कक्ष होते. एकत्रीत स्वागत कक्ष करण्याबाबत दोन्हीपक्षात मतभेद झाल्याची चर्चा आहे.

त्यामुळे महायुतीबाबतचा गुंता वाढत जाण्याची शक्यता आहे. सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्यामुळे फारशा राजकीय घडामोडी अपेक्षित नाहीत. मात्र कोल्हापुरात शुक्रवारी एका वजनदार मंत्र्यांच्या उपस्थितीत महायुती करण्याबाबत तसेच भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे मौन हे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यांच्या गटातील इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. उमेदवारीची खात्री नसल्यामुळे त्यांच्यात गोंधळाची परिस्थिती आहे. भाजपमधील उमेदवारी देताना कोणाचे वर्चस्व राहणार याचीही चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अद्याप महायुतीमधील जागांबाबत पत्ते खुले केलेले नाहीत. पण, शिवसेना (शिंदे गट) मात्र गतीने कामाला लागल्याचे गणेशोत्सवात दिसून आले आहे. सध्या या पक्षाकडून तब्बल 35 जागांवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यामुळे महायुती झाल्यास जागा वाटपचा गुंता निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेत्यांचा शब्द, इच्छुकांची कोंडी

भाजपकडून स्थानिक पातळीवरील शिर्ष नेतृत्वाने काही जणांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. त्यामुळेच वर्षापासून निवडणुकीची तयारी केलेल्यांना मात्र हक्काच्या प्रभागातून उमेदवारीसाठी डावलण्याची शक्यता आहे. अशा काही जणांना दुसरा प्रभाग शोधण्याचाही सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कोणालाही सध्या 100 टक्के उमेदवारीची हमी नसल्यामुळे अस्वस्थता आहे.

Local Body Elction DCM Eknath Shinde And CM Devendra Fadnavis
Local Body Elections : महापालिका निवडणुकीच्याआधीच 14 लाख मतदार वाढले; 'स्थानिक'साठी निवडणूक आयोग सज्ज!

FAQs :

प्र.1: इचलकरंजी महापालिका निवडणूक कधी आहे?
उ.1: ही इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक असून प्रभाग रचना जाहीर झाली आहे.

प्र.2: महाविकास आघाडीने काय निर्णय घेतला आहे?
उ.2: महाविकास आघाडीने सुरुवातीपासून एकत्र लढण्याची घोषणा केली आहे.

प्र.3: महायुतीकडून कोणता निर्णय झाला आहे का?
उ.3: नाही, महायुतीकडून अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.

प्र.4: शिवसेनेची काय तयारी आहे?
उ.4: शिवसेनेने तब्बल 35 जागांवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे.

प्र.5: भाजपकडून कोणती हालचाल होणार आहे?
उ.5: भाजपच्या उच्चस्तरीय मंत्र्यासोबत महायुतीवर चर्चा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com