Hasan Mushrif : निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ टार्गेट; इचलकरंजीतील पाणी प्रश्न पेटणार

Ichalkaranji Sulkud Water Scheme : इचलकरंजीचा सुरकुळ पाणी योजनेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळणार असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ टार्गेट इचलकरंजीतील पाणी प्रश्न पेटणार...?
hasan Mushrif Ichalkaranji Water scheme issue
hasan Mushrif Ichalkaranji Water scheme issue Sarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji Surkul Water Scheme : इचलकरंजीचा सुरकुळ पाणी योजनेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळणार असल्याचे चित्र आहे. शहरासाठी मंजूर असणारी पाणी प्रश्न योजना ताबडतोब राबवावी या मागणीवरून शहरवासी व आक्रमक झाले. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज इचलकरंजी दौऱ्यावर असताना सुरकुळ कृती समितीने त्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी ठेवली होती. त्यावरून मोठा तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेऊन आंदोलनाच्या पूर्वीच राष्ट्रवादीचे मदन कारंडे आणि लालबावट्याचे सदा मलाबादे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सुळकुड पाणी योजनेला परवानगी दिली होती. मात्र ही सुळकुड योजना राबवणे यासाठी कागलच्या लोकप्रतिनिधी सह जनतेने विरोध दर्शवला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी कागल विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सह नागरिकांनी या योजनेला विरोध केला. त्यामुळे ही योजना रखडली आहे.

hasan Mushrif Ichalkaranji Water scheme issue
Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसलेच...

इचलकरंजी (Ichalkarnji) शहरात ही योजना ताबडतोब चालू करावी. या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतापलेल्या इचलकरंजीतील सुळकुड पाणी योजना कृती समितीच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी ठेवली होती. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

hasan Mushrif Ichalkaranji Water scheme issue
Sharad Pawar News: 'तुतारी'मीच फुंकणार! 'या' मतदारसंघातून दररोज एक जण शरद पवारांच्या भेटीला

आंदोलनासाठी राजाराम स्टेडियम परिसरात जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी रक्तपाथाची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलन आणि पोलिसांच्या शाब्दिक वादावादी आणि झटापट झाले. त्यानंतर पोलिसांनी (police) आंदोलकांना ताब्यात घेतले. काँग्रेसचे राहुल खंजिरे, स्वाभिमानीचे विकास चौगुले, नागरिक मंचेचे अभिजीत पटवा, शिवसेनेचे सयाजी चव्हाण यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com