'आमदार होताच दुसऱ्याच दिवशी भाजपला पाठिंबा दिला : इचलकरंजीचा पहिला महापौरही भाजपचाच होईल'

इचलकरंजी महापालिकेची आगामी निवडणूकही आम्ही भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार आहोत.
Prakash Awade
Prakash AwadeSarkarnama

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी मी भारतीय जनता पक्षाला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिला. तेव्हापासून मी भाजपचेच काम करीत आहे. इचलकरंजी (Ichalkaranji) महापालिकेची आगामी निवडणूकही आम्ही भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार आहोत, त्यामुळे इचलकरंजीचा पहिला महापौर (mayor) हा भाजपचाच होईल, असा दावा आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी केला. (Ichalkaranji's first mayor will be from BJP : Prakash Awade)

इचलकरंजी येथील ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जवाहर सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार सोहळा हा पावसाळी वातावरण कमी झाल्यावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी एकत्रित चर्चा केली आहे. त्यानंतर मंत्री शहा यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आवाडे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Prakash Awade
बारामती जिंकायची ताकद फक्त महादेव जानकरांमध्येच : रासपच्या प्रदेशाध्यक्षांचा दावा

आमदार आवाडे म्हणाले की, मी आमदार म्हणून निवडून आल्यावर दुसऱ्याच दिवशी मुंबईत जाऊन भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कोणतीही अट घातलेली नव्हती. त्यांचे सरकार येणार की नाही, हे माहीतही नव्हते. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे त्यांचे सरकार आले नाही. पण, मी माझा पाठिंबा बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून मी भाजपच्या पाठिंब्यावर ठाम आहे. आजही भाजपचेच काम करीत आहे. यापुढेही पक्षाकडून दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणार आहे.

Prakash Awade
पवार चुलता-पुतण्याने राजकारणात मला २० वर्षे कोंडून ठेवले : शहाजी पाटलांचा गंभीर आरोप

फुटकळ टिकेवर मी बोलणार नाही. माझे काम बोलते, टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, अशा शब्दांत आमदार आवाडे यांनी माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले. सरकारकडून मक्तेदारांची देणी भागविण्यासाठी मी जबाबदारी घेतली होती. त्यासाठी आवश्यक माहिती मला दिली नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Prakash Awade
शिंदे गट अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारच देणार नाही; मग चिन्हासाठी घाई का? : शिवसेनेचा आयोगापुढे दावा

गंगा शुद्धीकरणाच्या धर्तीवर पंचगंगा शुद्ध झाली पाहिजे

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याबाबत आपली ठाम भूमिका आहे. उद्योगातून होणारे प्रदूषण थांबले पाहिजे. मोठ्या गावाच्या ठिकाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी झाली पाहिजे. गंगा नदी शुद्धीकरणाच्या धर्तीवर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. याप्रश्नी सरकारही गंभीर आहे, असे आवाडे यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com