दहिवडी : आज कुळकजाई भागाला जिहे-कटापूरचे पाणी द्या, ही मागणी इथली माणसं करत आहेत. ही भावना का निर्माण झाली. कारण जनतेला माहिती आहे, आपला आमदार, आपला खासदार डोंगरावरही पाणी आणू शकतो. सीतामाईच्या कृपेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर कुळकजाईला पाटाने पाणी येईल. एवढी ताकद त्या माणसात आहे, असा विश्वास माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
सीतामाई घाटाच्या तीन किलोमीटर अंतराच्या व साधारण पाच कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार गोरे बोलत होते.
आमदार गोरे म्हणाले, जिहे-कटापूरचे पाणी आंधळी धरणात आणून पुढील बत्तीस गावांना देणं ही माझी प्राथमिकता आहे. मला विश्वास आला की, मी कुळकजाई भागात पाणी कधी आणणार हे सांगेन. गावागावात, जातीजातीत संघर्ष लावणारी राष्ट्रवादी जिल्ह्यात आज कुठे आहे, असा प्रश्न करून ते म्हणाले, ''सातारा जिल्ह्यात अकरा आमदार व दोन खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीचे आता फक्त तीन आमदार व एक खासदार शिल्लक आहे.''
आमदार गोरे म्हणाले, ''एक काम सांगा जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून माण तालुक्यात, आंधळी गटात झालंय. असं असताना त्यांना मतं का पडतायेत. आपल्याला नव्याने पुन्हा प्रयत्न करावा लागेल.'' सगळ्यांनी जमिनीवर येवून काम करावं लागेल. पुढाऱ्यांचं विमान जमिनीवर आणण्याचं काम मतदार करत आहेत. आंधळी गटाने कायम मला साथ दिली व जिल्ह्याला नेतृत्व दिले. पाच वर्षापूर्वी आंधळी गटाने चूक केली. त्यामुळे हा गट पाच वर्षे मागे गेला. मतदान करताना चुकीच्या माणसाला मतदान करु नका.
यावेळी अर्जुन काळे, बाजार समिती सभापती विलास देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अतुल शिंदे, बाळासाहेब कदम, सोमनाथ भोसले, किसन सस्ते, दादासाहेब जगदाळे, दादासाहेब कद्रे, आप्पा बोराटे, दत्तात्रय सस्ते, कृष्णराव शेडगे, सरपंच विक्रम जगताप, भिवा कापसे, आनंदराव पवार, मारुती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.