Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार ? सांगलीत झळकले 'मराठा आरक्षण नाही तर मतदान नाही'चे बॅनर

Maratha Samaj Andolan : मराठा समाजाचे आंदोलन अद्यापही ठिकठिकाणी सुरूच
Sangli Maratha Reservation
Sangli Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचे आंदोलन अद्यापही ठिकठिकाणी सुरूच आहे. असे असतानाच आता सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडगमध्ये थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. "मराठा आरक्षण नाही तर मतदान नाही", असे बॅनरच गावाच्या वेशीवर झळकवण्यात आले आहे. या बॅनरची आता राज्याच चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले. त्यानंतर नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल सतरा दिवस आमरण उपोषण केले. जरांगे पाटलांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्च केल्याने हे आंदोलन चिघळले होते. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते.

Sangli Maratha Reservation
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील उपचारानंतर पुन्हा अंतरवालीत दाखल; आता साखळी उपोषणात होणार सहभागी

मराठा समाज आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करत असून आता मिरजमधील बेडग ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत. बेडगमधील नागरिकांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. "मराठा आरक्षण नाही तर मतदान नाही", असा बॅनरच गावाच्या वेशीवर झळकवले आहेत.

मराठा समाज आता शांत बसणार नसून राज्यातील आमदार, खासदारांनी दिल्ली दरबारी जाऊन न्याय मागावा, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, यासंदर्भातील ठराव प्रत्येक ग्रामसभेत करायला भाग पाडू, असा इशारा बेडगच्या ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

Sangli Maratha Reservation
Asim Sarode On Shirsat : ठाकरे गटाचे वकील असीम सरोदेंनी शिरसाटांना फटकारलं, म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांची वकिली करण्याचा...''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com