हिंमत असेल तर 'ईडी'ने माझ्याकडे यावे; सर्वांची यादी देतो : उदयनराजे

उदयनराजे म्हणाले, चांगले आहे ना, मला दृष्ट लागू नये, म्हणून ही त्यांची भावना असेल. कारण मी चांगले काम करत आहे. मला दृष्ट लागू नये, म्हणून असे काही तरी केले पाहिजे, असे त्यांना वाटत असेल.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : यांनी त्यांचे झाकायचे, त्यांनी यांचे झाकायचे, बस्स झाले सगळ्यांचे. सोयीचे राजकारण सध्या चालले आहे. आपण जे पेरतो तसं उगवतं. का माझ्या मागे ईडी नाही. ईडीला हिंमत असेल तर माझ्याकडे यावे, त्यांना मी सर्वांची पुराव्यासह यादी देतो. कोणी कुठल्याही पक्षातील असू देत, माझ्याकडे सगळ्यांची माहिती आहे, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावरून केला आहे.

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आज खासदार उदयनराजे भोसले हे प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शन व आरती करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईंविषयी विचारले असता उदयनराजे म्हणाले, ''आपण जसे पेरतो तसं उगवतं. का आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी काहीच वाईट केलेलं नाही, त्यांच्या मागे का ईडी नाही. यादी देईन पुराव्या सकट. ईडीला हिंमत असेल तर माझ्याकडे यावे. त्यांना मी सर्वांची पुराव्यासह यादी देतो. कोणीही आणि कुठल्याही पक्षातील असु देत, सगळ्यांची यादी देतो. माझ्याकडे सगळ्यांची माहिती आहे.''

MP Udayanraje performed Aarti of Bhavani Mata on Pratapgad
MP Udayanraje performed Aarti of Bhavani Mata on Pratapgadpramod Ingale, satara

हे सर्व भाजपकडून चालले आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, सध्या एकच चाललंय त्यांनी यांचे झाकायचे, यांनी त्यांचे झाकायचे. सोयीचे राजकारण सुरू आहे. तुमच्यावर तुमच्याच पक्षातील नेते व आमदार आरोप करत आहेत, यावर उदयनराजे म्हणाले, चांगले आहे ना, मला दृष्ट लागू नये, म्हणून ही त्यांची भावना असेल. कारण मी चांगले काम करत आहे. मला दृष्ट लागू नये, म्हणून असे काही तरी केले पाहिजे, असे त्यांना वाटत असेल. म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी समोरा समोर येऊन आरोप करावे, असे आव्हान त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना पुन्हा दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com