Ahmednagar News : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. नगर शहरातील सर्वेक्षणासाठी शिक्षकांसह महापालिकेतील पहिली नापास महिला सफाई कार्मचाऱ्याचीही प्रगणक म्हणून नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसा महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दावा केला आहे.
मराठा समाजाचे (Maratha Reservation) आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा तपासण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. नगर शहातील नेमलेल्या प्रगणकांच्या प्रशिक्षण आज महापालिकेत होते. कालपासून सर्व्हर डाऊन असल्याने अॅपच डाऊनलोड होत नव्हते. त्यााबाबत आज सायंकाळपर्यंत नेमलेल्या प्रगणकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे महापालिकेत झालेल्या प्रशिक्षणात गोंधळ होता.
प्रगणकांना प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेचे शिक्षक ज्यांना पूर्ण अॅपची माहिती नाही, ते प्रशिक्षण देत होते. त्यामुळे अधिकच गोंधळ उडला. महापालिकेच्या चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना प्रगणक म्हणून नेमणुका केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही कर्मचारी दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांनाही नेमणुकीचा आदेश आला आहे. याशिवाय सफाई कर्मचारी नेमले आहे. यातील काही कर्मचाऱ्यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. हे कर्मचारी आता नाव आणि सही पलीकडे काहीच लिहू शकत नाही, अशा सफाई कर्मचाऱ्यांना प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे.
एक महिला सफाई कर्मचारी पहिली नापास आहे. ही महिला साधा फोन वापरते. तिला अक्षरांची ओळख नाही. अर्जाचा पहिला प्रश्न आणि त्याचे उत्तर इंग्रजीमध्ये आहे. इतर प्रश्न मराठीत आहे. स्मार्ट फोन वापरता न येणाऱ्या महिलेची सर्वेक्षणासाठी नेमणूक म्हटल्यावर हे सर्वेक्षण कसे होणार, असा सवाल महापालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी प्रशिक्षणात वर्गात जाऊन उपस्थित केला. (Latest Political News)
अॅपमध्ये लॉगिन झाल्यानंतर अर्जात 183 प्रश्न आणि त्याची उत्तरे द्यायची आहेत. अॅप डाऊनलोड होत नाही. 70 टक्के कर्मचाऱ्यांची याबाबत तक्रार आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या देखील त्याच तक्रारी आहेत. नगर महापालिकेच्या नेमलेल्या कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे लेखी हरकत घेणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वेक्षणासाठी जलसंपदा, पाटबंधारे, महसूल विभागाचे कर्मचारी प्रगणक म्हणून का नेमणूक केली नाही, याची विचारणा करणार असल्याचे अनंत लोखंडे यांनी म्हटले. जिल्हा प्रशासनाकडे वशिलाबाजी करत २०० प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आपल्या नेमणूका रद्द करून घेतल्याचा दावा, लोखंडे यांनी केला. भाड्याने कर्मचारी लावा, पण हे काम पूर्ण करा; नाहीतर निलंबनाची कारवाई करू, अशी दडपशाही सुरू असल्याचाही आरोप लोखंडेंनी केला.
महापालिकेचे सर्व विभाग बंद
मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या सर्वेक्षणामुळे नगर महापालिकेची सर्व विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सर्व विभागात सर्वेक्षणामुळे कामकाज ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत, अशा लेखी सूचना लावण्यात आल्या आहेत. जन्म, मृत्यू, सशुल्क परवाने सर्व विभागाच बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे महत्त्वाचे दाखल काढण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून थांबली आहे. तसेच प्रगणक म्हणून नेमलेल्यांनी ऑर्डर रद्द करण्यासाठी भेटू नये, अशा देखील लेखी सूचना महापालिकेच्या विभागात लावलेल्या होत्या.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.