Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या 'या' शिलेदाराचा कॉन्फिडन्स; यंदा बीडमधून तिकीट मिळवणारच...

Beed Shivsena, Kundlik Khande : लवकरच बीडमध्ये संघटेनचा विभागीय मेळावा घेणार
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : 'बीड विधानसभा मतदारसंघातील 340 बूथवर आपण एकेक प्रमुख आणि त्यांच्याखाली प्रत्येकी 10 शिवदूत नेमले आहेत. आपली निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. हे पाहून पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीड विधानसभेतून आपल्यालाच उमेदवारी देतील. आपण यंदाची विधानसभा निवडणूक लढवणारच,' असा ठाम निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला आहे.

खांडे म्हणाले, 'कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा नेता अशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ओळख आहे. शेवटी ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र, आपल्याला 2019 च्या निवडणुकीतच तयारी करायला सांगितली होती. मात्र, ऐनवेळी जयदत्त क्षीरसागर पक्षात आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. आता आपण संपूर्ण तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचे जाळे, लोकांची कामे पाहता मुख्यमंत्री शिंदे आपणालाच उमेदवारी देतील,' असा कॉन्फिडन्स कुंडलिक खांडेंना आहे.

Eknath Shinde
Manoj Jarange Patil : लोणावळ्यात जरांगे-पाटील उपसणार टीकेची तलवार; सरकारवर आक्रमणाची पूर्ण तयारी

कुंडलिक खांडे यांनी सरपंच-उपसरपंच परिषद महाराष्ट्र राज्य ही संघटना स्थापन केली आहे. त्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. 'आपण २० वर्षांपूर्वी सरपंचपदापासून राजकीय सुरुवात केली. त्यामुळे सरपंचांना येणाऱ्या अडचणींची जाण आहे. त्यामुळे या अडचणी सोडवून त्यांना विकास प्रवाहात आणण्यासाठी संघटना स्थापना केली आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. 'आपण शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. उपतालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख व जिल्हा प्रमुख पदही पक्षानेच दिली. त्यामुळे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनाचा या घोषणेला मुहूर्त शोधला आहे,' असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde
Uddhav Thackeray News : भाजपच्या भळभळत्या जखमेवर उद्धव ठाकरेंनी पुन्हा मीठ चोळले

'आपण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून राज्यभर संघटनेचे जाळे विणणार आहोत. नवीन सरपंच, उपसरपंचांना पंचायत समिती, जिल्हा परिषदेत विविध अडचणी येतात. संघटनेच्या माध्यमातून त्या सोडविल्या जातील. लवकरच बीडमध्ये संघटेनचा विभागीय मेळावा घेणार आहे. विधानसभा निवडणुकीत या संघटनेचा फायदा शिवसेनेला राज्यभर होईल,' असा विश्वास व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून संघटनेतील सरंपचांच्या गावात विकास कामे केली जातील. सरपंचांचे वेतन, वित्त आयोग निधी आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील,' अशी ग्वाहीही त्यांनी दिली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी परमेश्वर तळेकर यांच्या निवडीची घोषणाही त्यांनी केली. यावेळी जयसिंग चुंगडे, कमरान शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Maratha Reservation : '...म्हणून यापुढची रसद ‘त्या’ युवकांच्या कुटुंबीयांना देणार' ; मराठा समाजाचा मोठा निर्णय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com