Satara Hording News : मुंबईच्या होर्डिंग दुर्घटनेचा साताऱ्यात 'इम्पॅक्ट'; जिल्हाधिकाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश!

Satara District collector : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Satara District collector Office
Satara District collector OfficeSarkarnama
Published on
Updated on

Satara News : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेतून बोध घेत सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घेतलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व होर्डिंगचे स्टक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत.शहरी भागातील होर्डीगचे स्ट्रक्चरल ऑडिट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तर महामार्गावरील स्ट्रक्चर ऑडीट रस्ते विकास महामंडळाने करावे. त्याचा अहवाल येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपवनंसरक्षक आदिती भारद्वाज, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satara District collector Office
Panchganga River Pollution : माशांचे पिंडदान अन् शंभर किलोचा हार, मनसेच्या आंदोलनाने सारेच अवाक

हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी ज्यावेळी ऑरेंज अलर्ट जारी केला जाईल, त्यावेळी पूर व दरड प्रवण गावातील नागरिकांना त्यांच्या पशुधनासह तात्काळ हलविण्याची व्यवस्था करावी. नागरिकांच्या निवारा, अन्न, पाणी, वीज आदींची सोयींबरोबर जनावरांसाठी पाण्याची व चाऱ्यांची व्यवस्था करावी. नागरिकांच्या स्थलांतराची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांच्याकडे द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पुराचा संभाव्य धोका असणाऱ्या गावांना अन्नधान्याचा पुरेसासाठा उपलब्ध करुन द्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे.

संभाव्य दरडप्रवण ठिकाणी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध ठेवावी. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. सर्व विभागांनी तालुकास्तरावर मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा २० मे पर्यंत सादर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

Satara District collector Office
Kolhapur Lok Sabha Election : तीन उमेदवारांचा खर्च अर्धा कोटींवर, अंतिम तपासणीत धैर्यशील माने आघाडीवर

तसेच मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील होर्डीग व पाटबंधारे विभागाने बांधलेल्या पाझर तलावांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट शहरी भागात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी तर महामार्गावरील स्ट्रक्चर ऑडिट रस्ते विकास महामंडळाने करावे. पाझर तलावांचे स्ट्रक्चरल ऑडिट पाटबंधारे विभागाने करावे. स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल येत्या 15 दिवसात सादर करावे. या कामाला विशेष प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com