Panchganga River Pollution : माशांचे पिंडदान अन् शंभर किलोचा हार, मनसेच्या आंदोलनाने सारेच अवाक

MNS Protest in kolhapur : प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्याच्या निषेधार्थ मनसेने (MNS) अनोखे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Panchganga river pollution
Panchganga river pollution Sarkarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रतिनिधींकडून पंचगंगा प्रदूषणाचा नारा नेहमीच दिला जातो. मात्र गेल्या वीस वर्षांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण जैसे तेच आहे. पंचगंगा नदीच्या वाढलेल्या प्रदूषणामुळे जलचरांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय पिण्याच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या गावच्या लोकांना देखील आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. सातत्याने प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्याच्या निषेधार्थ मनसेने (MNS) अनोखे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोल्हापूरच्या (Kolhapur) पंचगंगा नदीतील मृत माशांचे पाप इचलकरंजीकरांना लागू नये म्हणून मनसेच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. इचलकरंजी (Ichalkaranji) इथं पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे मृत झालेल्या माशाना घाटावर एकत्र करून माशांचे पिंडदान केलं. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासनाला जागे करण्यासाठी हे अनोखे आंदोलन मनसेनं केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Panchganga river pollution
Supreme Court on ED : …तर ‘ईडी’ आरोपीला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका

पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न न करता अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत. असा आरोप मनसेच्या पदाधिकार्‍यांनी केला. जर पुढच्या काही दिवसात पंचगंगा प्रदूषणातून मुक्त नाही झाली. किंवा प्रशासनाने प्रदूषण मुक्तीसाठी पावले उचलली नाहीत, तर 100 किलो फुलांचा हार अधिकाऱ्यांना घालून सत्कार करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.Panchnama of Panchganga river pollution in Kolhapur.

पंचगंगा प्रदूषणावरून राजकारण तापलं

कोल्हापूरची वरदायीनी असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न हा गेल्या कित्येक वर्षांपासून भिडसावत आहे. पंचगंगेचे पाणी हे मोठ्या प्रमाणात दूषित झाले असून पंचगंगा ही आता गटारगंगा झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 42 दशलक्ष लीटर सांडपाणी तसेच नदी परिसरातील ग्रामपंचायतीचे घरगुती सांडपाणी प्रक्रियेविना थेट पंचगंगा नदीत सोडण्यात येत आहे. या साडेनऊ वर्षात प्रशासनाने व प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी नेमकं काय केलं? असा सवाल करत न्यायालयासमोर याबाबतचा अहवाल मांडण्याची मागणी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. Panchganga river pollution

Panchganga river pollution
Election News : सहकारात निवडणुकाचं वावटळ उठणार, लोकसभेच्या निकालानंतर 291 संस्थांच्या निवडणुका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com