Kolhapur Politics : 'रस्सी जल गयी, लेकिन बल नही गया' : खासदार महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल

Dhananjay Mahadik News : कोल्हापुरात नेहमीच खासदार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय टीका-टिपण्णी पाहायला मिळते.
Dhananjay Mahadik, Satej Patil News
Dhananjay Mahadik, Satej Patil NewsSarkarnama

Kolhapur News : कोल्हापुरात नेहमीच खासदार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय टीका-टिपण्णी पाहायला मिळते. साखर कारखाना असो वा लोकसभा निवडणूक त्यामध्ये महाडिक आणि पाटील हा संघर्ष असतोच. त्यात आता दहीहंडी उत्सव देखील मागे राहिला नाही. धनंजय महाडिक किंवा सतेज पाटील यांचा कोणताही खुला व्यासपीठ कार्यक्रम असला की समजून जायचे, कार्यकर्त्यांना राजकीय मेजवानी मिळणार आहे. गुरुवारी देखील त्यांचा प्रत्यय आला. निमित्त होते दसरा चौक येथे धनंजय महाडिक युवाशक्ती आयोजित दहीहंडीचे...

गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), माजी आमदार अमल महाडिक यांच्यात गोकुळ दूध संघ आणि छत्रपती राजाराम कारखान्यासंदर्भात आरोप - प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसने (Congress) जिल्ह्यात जनसंवाद यात्रा सुरू केल्यानंतर धनंजय महाडिक यांनी त्यावर टीका केली होती. भारत पूर्वीपासूनच जोडला असताना ही यात्रा कशासाठी ? त्यातून जनतेला काय मिळणार असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर सतीश पाटील यांनी लोकसभा-विधानसभा निवडणूक लागल्यावर जनतेला काय मिळाले ? हे जनता महाडिक यांना दाखवून देईल, असे प्रत्युत्तर दिले होते.

Dhananjay Mahadik, Satej Patil News
Rajaram Sugar Factory News : निवडणुकीला चार महिने झाले तरी सतेज पाटलांना पराभव पचवता आला नाही ; अमल महाडिकांनी डिवचले

त्यावर गुरुवारी पत्रकार परिषद घेत राजाराम संदर्भात आमदार पाटील यांनी सत्याचाच विजय होतो, असे म्हणत प्रादेशिक सहसंचालकांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे बोगस 1 हजार 272 सभासदांचे सभासदत्व रद्द केले असल्याचे सांगितले. सतेज पाटील यांच्या या भूमिकेचा लवकरच योग्य वेळी समाचार घेईन, गोपाळकाल्यादिवशी बोलणे उचित ठरणार नाही. 'रस्सी जल गई लेकिन बल नही गया' असे म्हणत, धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना टोला लगावला.

Dhananjay Mahadik, Satej Patil News
Rajaram Sugar Factory News : राजारामच्या बोगस सभासदांचा 'कंडका' पडला !

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभूत केल्यानंतर विधानसभा आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही सतेज पाटील (Satej Patil) यांनी महाडिक गटाला पराभूत केले होते. त्यावेळी एकच ठरले होते गोकुळ उरले अशी टॅगलाईन पाटील यांनी दिली होती. त्यानंतर महाडिक यांची एकमेव सत्ता राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी कारखान्यात सतीश पाटील यांनी पॅनेल उभा करून आता कंडका पाडायचा, या टॅगलाईन खाली निवडणूक लढवली होती. मात्र, महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का दिला होता.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com