Lonand : लोणंदला भाजपच्या नगरसेविकेवर चाकू हल्ला; लाखांचा ऐवज लंपास

नगरसेविका corporator सौ. घाडगे यांनी स्कूटीवरून अर्धा किलोमिटर अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. या घटनेची माहिती मिळताच लोणंदचे lonand सहायक पोलिस निरिक्षक API विशाल वायकर व त्यांचे सहकारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.
Lonand
Lonand sarkarnama
Published on
Updated on

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या भाजप नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर आज सकाळी लोणंद - निंबोडी रस्त्यावर मोटार सायकलवरून पाठीमागून आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी चाकूचा हल्ला केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पर्स, मोबाईल व रोकड असा सुमारे एक लाखांचा ऐवज लुबाडून नेला. यामध्ये नगरसेविका सौ. घाडगे यांच्या हातावर चाकूचा वार झाल्याने त्या जखमी आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, नगरसेविका तृप्ती घाडगे या आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घाडगे मळ्यातील घरातून स्कूटी क्रमांक ( एमएच -११- बीजे- ९२४१) वरून सेन्ट अॅन्स इंिग्लश मिडियम स्कूलमध्ये मिटींगसाठी निघाल्या होत्या. त्या शेळके वस्तीवरील बबनराव शेळके - पाटील यांच्या घरा समोरुन जाणाऱ्या कच्चा रस्त्याने निबोंडी रस्त्याकडे जात होत्या.

त्यावेळी पाठीमागून मोटारसायकल वरून येणाऱ्या अज्ञात तिघांनी त्यांना दोनवेळा ओव्हरटेक केले व पुढे चढावर जावून थांबले. नगरसेविका सौ. घाडगे या बाजूने जात असतानाच या तिघांपैकी एकाने हातात चाकू घेऊन त्यांना थांबवण्यास भाग पाडले. त्यावेळी सौ. घाडगे यांनी आरडाओरडा केला. मात्र, आसपास कोणीही नसल्याने दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. स्कूटीला आडकवलेली मोबाईल व रोख रक्कम असलेली पर्स ओढताना प्रतिकार करताना सौ. घाडगे यांच्या हातावर चोरटयांनी चाकूचा वार केला.

Lonand
अशी तयार केली घरीच गावठी पिस्तुल : राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर झाडल्या गोळ्या

त्यानंतर चोरट्यांनी वाऱ्याच्या वेगाने रेल्वे रूळ ओलांडून कापडगावच्या दिशेने पोबारा केला. हातातील रक्त गळत, असतानाही नगरसेविका सौ. घाडगे यांनी स्कूटीवरून अर्धा किलोमिटर अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.मात्र, दिवसा ढवळ्या आणि तेही नेहमीच्या रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे.

Lonand
भाजप-राष्ट्रवादीने ताकद लावलेल्या घोडगंगा कारखान्यासाठी ७२ टक्के मतदान; उद्या मतमोजणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com