Gram Panchayat Election : मंगळवेढ्यातील 27 पैकी 23 ग्रामपंचायतींत उपसरपंच बिनविरोध, तर चार ठिकाणी झाले मतदान!

Mangalvedha Taluka : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंचाच्या निवडी झाल्या.
Mangalvedha
Mangalvedha Sarkarnama
Published on
Updated on

हुकूम मुलानी -

Solapur news : मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड ही बिनविरोध झाली, तर उर्वरित चार ग्रामपंचायतींचे सरपंच हे मतदानाद्वारे निवडले गेले. मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंचाच्या निवडी झाल्या.

आज एकाच दिवशी तालुक्यातील 27 गावांच्या उपसरपंचाच्या निवडी थेट जनतेमधून निवडलेल्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यामध्ये नंदुर, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी, रड्डे चार गावांच्या उपसरपंच पदासाठी मतदान झाले. त्यामध्ये नंदुर येथे उपसरपंच पदासाठी कल्लाप्पा बगले व तुकाराम हनमने यांना समान मतदान झाल्यामुळे निर्णायक मत सरपंच सुमन गोडसे यांनी कल्लाप्पा बगले यांच्या पारड्यात टाकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय लक्ष्मी दहिवडी येथे सुजाता शिंगाडे आणि शकुंतला टाकले यांच्यात मतदान झाले. सुजाता शिंगाडे यांच्या बाजूने नऊ, तर शकुंतला टाकले यांच्या बाजूने चार मते पडली. रड्डे येथे सारिका खांडेकर व अमोल माने यांच्यात मतदान झाले. त्यात सारिका खांडेकर यांना सात, तर अनिल माने यांना पाच मते पडली. शेलेवाडी येथे सुवर्णा चव्हाण व मनोज चव्हाण यांच्यात मतदान झाले, त्यामध्ये सुवर्णा चव्हाण या विजयी झाल्या.

Mangalvedha
Gram Panchayat Election : सरपंच, उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारताना सदस्यांसह गावातून काढली जंगी मिरवणूक!

हिवरगाव येथे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली, त्यांनी सरपंचपद स्वताकडे तर विरोधी गटाला उपसरपंच पद देऊ केले. त्यामध्ये अश्विनी लवटे या बिनविरोध निवडल्या गेल्या. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला.

गावनिहाय नवनिर्वाचित उपसरपंच -

सुवर्णा चव्हाण (शेलेवाडी), शहाजी आवताडे (शिरशी), अशोक जाधव (खडकी), अर्चना कांबळे (जुनोनी), सीताराम बनसोडे (देगाव), अमोल सरवदे (अकोला), राजू बेदरे (बठाण), संगीता सोनवणे (उचेठाण), नीलाबाई कटरे (ममदाबाद हु.), किसाबाई सरगर (रेवेवाडी), नवनाथ मेटकरी (चिक्कलगी), सुजाता लिघाडे (भाळवणी), काशीराम चौखंडे( जंगलगी), शांताबाई शिंदे (डिकसळ), रमेश ठेंगील (मुंढेवाडी), प्रकाश भोसले खुपसंगी), शिवनेरी खांडेकर (निंबोणी), ललिता मदने (लोणार), मीनाक्षी शिंदे (मानेवाडी), सुजाता शिंगाडे (लक्ष्मी दहिवडी), सारिका खांडेकर ( रड्डे), कल्लाप्पा बगले (नंदुर), भारत लेंडवे (आंधळगाव), केराप्पा बावधने (पडोळकरवाडी), भीमू कोरे (जालीहाळ),अश्विनी लवटे (हिवरगाव), संदीप पाटील (ब्रह्मपुरी)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com