Sangola Politic's : सांगोल्यात भाजपने शेकापचा उमेदवारच 'हायजॅक' केला अन्‌ नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली!

Nagar Palika Election 2025 : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठे राजकीय नाट्य घडले. भाजपला उमेदवार न मिळाल्याने मारुती बनकर यांना पक्षात दाखल करून अधिकृत उमेदवार करण्यात आले आणि शेकापनेही पाठिंबा दिला.
Sangola Politic's
Sangola Politic'sSarkarnama
Published on
Updated on
  1. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपला शेवटच्या दिवशीही उमेदवार न मिळाल्याने शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांना तातडीने भाजपमध्ये आणून उमेदवारी देण्याचा नाट्यमय निर्णय घेण्यात आला.

  2. बनकर यांच्या उमेदवारीला शेकाप आमदार डॉ. देशमुख यांच्यासह भाजप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांचा पाठिंबा मिळाल्याने सांगोल्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली.

  3. शहाजीबापू पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल जाहीर केल्याने निवडणूक अधिक चुरशीची होणार असून सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sangola, 17 November : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने सांगोला नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची राणाभीमदेवी थाटात घोषणा केली. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारच मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने नगराध्यक्षपदासाठी घोषित केलेले उमेदवार ज्येष्ठ नेते मारुती बनकर यांना तातडीने भाजपमध्ये आणून पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षानेही भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सांगोला (Sangola) नगरपालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर शेकाप, भाजप आणि शिवसेना या तीनही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मारुती बनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी नगराध्यक्षा राणी माने यांचे पती आनंदा माने यांची उमेदवारी जाहीर केली होती. भाजपकडून (BJP) मात्र स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. मात्र, तुल्यबळ पर्याय नसल्याने भाजपचा उमेदवार कोण, याबाबत संभ्रम होता.

या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेचा आज क्लायमॅक्स झाला. शेकापने घोषित केलेले उमेदवार मारुती बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आमदार डॉ. देशमुख यांनीही अधिकृत पाठिंबा देत भाजप उमेदवारासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटली आहेत.

Sangola Politic's
BJP Candidate List : मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये भाजपचे स्वतंत्र पॅनेल; अक्कलकोटमध्ये कल्याणशेट्टींच्या भावाला संधी, वाचा भाजप उमेदवारांची यादी

दरम्यान, माजी आमदार दीपक साळुंखे हेही भाजपसोबत उभे राहिल्याने दोन आजी-माजी आमदार एका उमेदवाराच्या पाठीशी उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे शहाजीबापू पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल जाहीर केल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

नगराध्यक्षपदावर भाजपचा प्रभाव नसतानाही त्यांनी उमेदवार दिला, त्याला शेकापचा पाठिंबा मिळाला. माजी आमदार साळुंखे हेही भाजपच्या व्यासपीठावर दिसू लागल्याने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शेकापने स्वतःचा उमेदवार भाजपकडे दिला आणि त्यालाच पाठिंबा दिल्याबाबत विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. राजकीय वातावरण तापले असताना सांगोल्यातील मतदार मात्र या नव्या समीकरणांकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

Sangola Politic's
Mohol Politic's : अजितदादांच्या उमेदवाराला बंदोबस्तात पहाटेच गाठावे लागले अनगर; राजन पाटलांच्या सुनेविरोधात राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज

1. भाजपला सांगोल्यात उमेदवार कसा मिळाला?
भाजपने शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली.

2. मारुती बनकर यांना कोणाचा पाठिंबा आहे?
शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांचा त्यांना पाठिंबा आहे.

3. सांगोला निवडणूक चुरशीची का होत आहे?
शहाजीबापू पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने स्पर्धा दुरंगी झाली आहे.

4. सोशल मीडियावर कोणती चर्चा सुरू आहे?
शेकापचा घोषित उमेदवार भाजपकडे देऊन त्यालाच पाठिंबा दिल्याने लोक विविध राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com