Ramraje Naik - Nimbalkar News : काका - पुतण्यातील वाद कधी मिटेल ? रामराजेंनी स्पष्टच सांगितले...

Madha Loksabha : माढा मतदारसंघातून भावासाठी मागितले तिकिट ; उमेदवारीचा निर्णय दिल्लीतून...
Ajit Pawar, Ramraje Naik - Nimbalkar, Sharad Pawar
Ajit Pawar, Ramraje Naik - Nimbalkar, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : महायुतीच्या जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघाची मागणी अजित पवारांनी केली आहे. त्याबाबत चर्चा सुरु आहे. माढा मतदारसंघातून माझ्या भावासाठी तिकिट मागतोय. त्यासाठी आमचा कोणावरही दबाव नाही. पण, उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय दिल्लीतून होणार आहे, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी व्यक्त केले. (Ramraje Naik - Nimbalkar's statement on Ajit Pawar and Sharad Pawar controversy)

दरम्यान, मोदींच्या दौऱ्याने आमदार गोरेंचा माण, खटाव मतदारसंघात दबदबा वाढतोय, असे वाटतंय का, यावर त्यांनी हे आता मोदींनाच विचारा, असा टोला लगावला. तर राष्ट्रवादीतील वादावर त्यांनी स्पष्टच भाष्य केले. स्वराज्य सप्ताहाची माहिती व पदाधिकारी निवडीच्या बैठकीनंतर रामराजेंनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.

Ajit Pawar, Ramraje Naik - Nimbalkar, Sharad Pawar
Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्री शिंदे अन् स्टाइल स्टेटमेंट

राजकीय वैर...

फलटणमधील तुमच्या वादाचा महायुतीच्या राजकारणावर परिणाम होणार का, यावर ते म्हणाले, फलटणमध्ये खासदारांच्या वडीलांच्यापासून आमचे राजकीय वैर आहे. आमचे जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर यांच्याशीही वैयक्तिक जमलेले नाही. जो तो त्याच्या पद्धतीने राज्य करत असतो. माझ्यावर कोणी बोललं तर मी बोलणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर मोदींच्या दौऱ्यामुळे जयकुमार गोरेंचा माण, खटाव मतदारसंघात दबदबा वाढतोय, असे तुम्हाला वाटत नाही का, यावर ते म्हणाले, हे पंतप्रधान मोदींनाच विचारा, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पोलिस ठाण्यात गोळीबाराचे प्रकार वाढले असून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर रामराजे म्हणाले, हा प्रकार वैयक्तिक वादातून झालेला आहे. आमदारांचा गोळीबार मान्य होणार नाही. त्याच्या मागची कारणे तपासात निघतील. पण झालेला प्रकार योग्य वाटत नाही.

काका - पुतणे वाद...

राष्ट्रवादीत दोन गट असून कार्यकर्त्यांच्या मते आगामी काळात काका - पुतणे यांनी एकत्र यावेत व वाद संपवावा. भविष्यात तुम्ही यासाठी पुढाकार घेऊ शकता का ? यावर रामराजे म्हणाले, आजच्या घटकेला अशा कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. हा तर त्यांच्या घरातील अंतर्गत वाद असून तो कधी मिटेल ते कोणालाही सांगता येणार नाही. आमच्या सारख्याला पक्षातील ही फुट पचवायला अवघड गेली आहे.

शेवटी राजकारणात जेवढा नेता महत्वाचा तेवढाच कार्यकर्ताही असतो. त्यांच्याच बळावरच नेत्याचे काम चालते. आम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागेल, हे कार्यकर्त्यांना माहिती नसते. इतर घराण्यासह छत्रपतींचे घराणे आहे. त्यांच्यातही वाद होऊ नयेत ही आमची भूमिका आहे. वाद होणे कोणालाही परवडणारे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भावासाठी माढा...

माढा व सातारा लोकसभेच्या जागेबाबत रामराजे म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघाची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याबाबत चर्चा सुरु आहे. माढा मतदारसंघातून मी माझ्या भावासाठी तिकिट मागतोय. ते मिळाले तर विद्यमान खासदारांना ते मिळणार नाही, असे माझे म्हणणे होते. त्यासाठी आमचा कोणावर ही दबाव नाही. पण, उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय दिल्लीतून होणार आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

Ajit Pawar, Ramraje Naik - Nimbalkar, Sharad Pawar
Ravindra Chavan : संजयकाका, पृथ्वीराज देशमुखांचे टेन्शन वाढले; रवींद्र चव्हाण नेमके काय म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com