Ravindra Chavan : संजयकाका, पृथ्वीराज देशमुखांचे टेन्शन वाढले; रवींद्र चव्हाण नेमके काय म्हणाले ?

Sanjaykaka Patil, Pruthwiraj Deshmukh : खासदार पाटील आणि देशमुख हे दोघेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करीत आहेत.
Pruthwiraj Deshmukh, Sanjaykaka Patil
Pruthwiraj Deshmukh, Sanjaykaka PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : सांगली लोकसभेसाठी भाजपमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यातच सांगलीत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. देशाचा विकास आणि उज्वल भविष्यासाठी महायुतीकडून सांगलीला जो कोण उमेदवार लोकसभेला असेल, त्यांच्या पाठीशी आपल्याला राहावे लागेल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी केलेले वक्तव्य मात्र विद्यमान खासदार संजयकाका आणि इच्छुक असणारे देशमुख यांचे टेन्शन वाढवणारे आहे.

सांगली आणि मिरज शहरात विकासकामांचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil), आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

मंत्री चव्हाण म्हणाले, चालू वर्षी सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून चांगला वाटा द्यायचा आहे. देशाचा विकासासाठी महायुतीकडून जो कोण उमेदवार लोकसभेला असेल, त्यांच्या पाठीशी आपल्याला राहावे लागणार आहे. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित भाजप नेत्यांच्याही भुवया उंचावल्या.

Pruthwiraj Deshmukh, Sanjaykaka Patil
Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्री शिंदे अन् स्टाइल स्टेटमेंट

सांगलीमध्ये भाजपचे खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (Priwiraj Deshmukh) यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. असे असताना मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत खासदार पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले. मात्र, बावनकुळे यांनी हे महायुतीचे कार्यालय असल्याचे जाता-जाता सांगितले. त्यामुळे सांगली लोकसभेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम असल्याचे चित्र होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेसाठी विद्यमान खासदार पाटील यांना आव्हान देत माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडेही देशमुख यांनी लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली आहे. विद्यमान खासदार पाटील आणि देशमुख हे दोघेही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करीत करीत आहेत. खासदार पाटील यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट् ट्रिक मारण्याचा चंग बांधला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी उमेदवारीवरून केलेल्या वक्तव्याने संजयकाका आणि देशमुखांचे टेन्शन वाढल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Pruthwiraj Deshmukh, Sanjaykaka Patil
BJP Vs Shiv Sena: ‘वावरा’तून भाजपला शिवसेना दाखवणार ‘पावर’!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com