Shirdi Lok Sabha : शिर्डीत रंगणार पुन्हा एकदा आठवले-वाकचौरे लक्षवेधी लढतीचा थरार; कुणाचं पारडं जड ?

Ramdas Athawale Vs Bhausaheb Wakchoure : रामदास आठवले पराभवाचा वचपा काढतील?
Lok Sabaha
Lok SabahaSarkarnama

Shirdi News : शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेस आघाडीकडून रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी येथून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी धक्कादायक पराभव केला होता. 2009 च्या लक्षवेधी लढतीची पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती 2024 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. रामदास आठवले यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे शिर्डीतून निवडणूक लढवण्याच्या व्यक्त केलेल्या इच्छे मुळे ही शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

शिर्डीतून 2009 ला आठवले काँग्रेस आघाडीचे उमेदवार होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यावेळी विखे, थोरात, पिचड, कोल्हे, ससाणे असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व असताना झालेला पराभव आठवलेंना मोठा जिव्हारी लागला होता. त्यावेळी आठवलेंच्या बाबतीत मतदातसंघात ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढतील, असा बागुलबुवा निर्माण केल्याचे बोलले जाते. असे असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी आठवलेंना खरोखर मनापासून मदत केली का ? यावर पराभवानंतर खुद्द आठवलेंनीच प्रश्न उपस्थित करून खंत व्यक्त केली होती.

Lok Sabaha
Ahmednagar Politics : नगर जिल्ह्यात ठाकरेंची ताकद वाढणार ; भाऊसाहेब वाकचौरे अन् काँग्रेसचे छल्लारे गुरुवारी शिवबंधन बांधणार

जिल्हा परिषदेत अधिकारी आणि त्यानंतर शिर्डी संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अशा पदांवर राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे निवृत्तीनंतर राजकारणात आले ते विखें परिवाराच्या पाठबळावर, असे बोलले जाते. 2009 ला मतदारसंघ पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा अनुसूचित जाती साठी राखीव झाल्याने काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित असलेले वाकचौरे यांनी शिवसेनेचा मार्ग चोखाळत उमेदवारी घेतली. त्यांच्या विजयात ते अकोले तालुक्याचे भूमिपुत्र असल्याने तसेच विखेंसह काँग्रेस नेत्यांचा अदृष्य हात पाठीशी राहिल्याने, सोबतच बाहेरचा उमेदवार आणि ॲट्रॉसिटीचे कथित मुद्दा चर्चेत आणल्याने आठवले यांचा मानहानीकारक पराभव झाला. या पराभवाची बोच आठवलेंनी अनेकदा बोलून दाखवली आहे.

आता आठवले पुन्हा शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असून यावेळी ते एनडीए'चे उमेदवार असतील तर त्यांच्या समोर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे असतील. 2009 ते 2003 पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले, तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत नियतीने आठवले विरुद्ध वाकचौरे अशी लढत पुन्हा एकदा होऊ घातली आहे.

Lok Sabaha
PM Narendra Modi Meet ISRO : तुम्हाला भेटण्यासाठी प्रचंड उत्सुक होतो; इस्रोच्या शास्त्रज्ञांसमोर पंतप्रधान मोदी भावुक !

काँग्रेस आघाडीचे 2009 साली आठवले उमेदवार होते, आता 2024 ला उमेदवारी अंतिम झाली तर भाजपचे आणि एनडीए आघाडीचे उमेदवार असतील. तर वाकचौरे 2009 प्रमाणेच शिवसेनेचे आणि आता ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील. 2009 ला आठवलेंसोबत असलेली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ठाकरे शिवसेने सोबत असल्याने त्याचा फायदा वाकचौरे यांना मिळेल तर एकट्या विखेंच्या राजकीय ताकतीवर आठवलेंना वाकचौरेंचा करावा लागणारा सामना अटीतटीचा असणार आहे. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा 2009 च्या लक्षवेधी लढतीचा राजकीय थरार शिर्डी लोकसभा मतदारसंघात रंगणार एव्हढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com