Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ही मतमोजणी २ वाजता सुरु झाली. आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या आहेत. दोन्ही फेऱ्यांमध्ये सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनाही चांगली मते मिळत आहेत.
दुसऱ्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांना 31 हजार 009 मते मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 16 हजार 316 मते मिळाली आहेत. तांबे यांनी 14 हजार मतांची आघाडी घेतली आहे. मात्र, हा निकाल शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांना शेवटच्या फेरीपर्यंत विजयासाठी वाट पहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात पहिल्या फेरीच्या सुरुवातीला अटीतटीची लढत दिसत होती. दोघांच्याही नावासमोर मतपत्रिकांचा जवळपास सम-समान गट्टे होते. मात्र, त्यानंतर तांबे यांनी आघाडी घेतली. तांबे यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरु केला आहे. त्यांच्या विजयाचे बॅनरही लावले आहेत.
दरम्यान, विधान परिषजेच्या तीन जागांवर सध्या मतमोजणी सुरु आहे. कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराने विजय मिळवला आहे.
तर औरंगाबाद शिक्षक मतदार संघात मतमोजणी सुरु असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) विक्रम काळे आघाडीवर आहेत. तसचे अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये काटेकी टक्कर सुरु आहे. मात्र, येथे काँग्रेसचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.