Satara Politic's : ‘पूर्वी माण-खटावला कोणी विचारत नव्हतं; आता आपल्यालाशिवाय एकही निर्णय होत नाही...’

Jaykumar Gore Statement : ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे यांच्या माण-खटाव मतदारसंघाचे राजकीय महत्त्व वाढले आहे. सातारा आणि सोलापूरच्या राजकारणात हा भाग केंद्रबिंदू ठरत असल्याचे गोरे यांनी सांगितले.
Jaykumar Gore
Jaykumar Gore Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 16 August : जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री झाल्यापासून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण-खटाव चर्चेत आला आहे. गेली दोन वर्षे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सूत्रं याच भागातून बऱ्यापैकी हालत आहेत. त्यामुळे माण खटाव हे दोन्ही जिल्ह्याच्या राजकीय केंद्रबिंदूप्रमाणे ठरत आहेत. खुद्द मंत्री गोरे यांनी याबाबत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. पूर्वी माण खटावला कोणी विचारत नव्हतं; पण आता आपल्याला विचारात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय होत नाहीत, असे जाहीरपणे सांगितलं आहे.

वर्धन साखर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. शिवाय गेल्या काही वर्षांपासून प्रस्थापित राजकारण्यांकडून मिळालेल्या वागणुकीबाबत त्यांनी सूचक विधान केले आहे.

मंत्री गोरे म्हणाले, पूर्वी माण-खटाव या दुष्काळी भागाला कोणी विचारात घेत नव्हतं. मात्र, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. परिस्थिती बदलली असून महत्वाचे निर्णय माण खटावला विचारात घेतल्याशिवाय होतच नाहीत.

माण खटावमधून आता अनेक महत्वाची सूत्रे हलत आहेत. ही बाब या भागासाठी अभिमानाची आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येऊन माण खटावचा नावलौकीक आणखी वाढवू या, असेही आवाहनही भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

Jaykumar Gore
Babajani Durrani Vs Saeed Khan : पाथरीत 243 कोटींच्या कथित भ्रष्टाचारावरून रणकंदन; सईद खानांचा दुर्राणींना तुरुंगाचा इशारा

जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण खटावचे लोकप्रतिनिधी आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्रामविकास सारखे महत्वाचे खाते आले आहे. तसेच सोलापूरचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे देण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची सर्व सूत्रे गोरेंच्या घरातूनच हलतात.

ग्रामविकास मंत्रिपदासारखे पद असल्याने सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांनी आपल्या नेतृत्वाचा करिश्मा दाखवला आहे, त्यामुळे सोलापूरबरोबरच सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आता गोरेंच्या शब्दाला मोठी किमत असल्याचे दिसून आले आहे.

Jaykumar Gore
Hiraman Khoskar : एकनाथ शिंदेंना भेटलो तेव्हा मला शिव्या दिल्या; व्हायरल क्लिपवर आमदार खोसकरांनी आरोप फेटाळले, मुलाची बाजू घेतली...

विधान परिषद निवडणुकीत त्याचे प्रत्यत्तर आले आहे. गोरेंनी सूचविलेल्या धैर्यशील कदम यांना भाजपकडून तिकिट मिळाले आणि मित्रपक्षाशी यशस्वी बोलणी करत कदमांचा विजयही साकारला, त्यामुळे गोरे यांनी माण खटावचे महत्व आपल्या बोलण्यातून अधोरेखित करून दाखवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com