Sangli Lok Sabha Result : सांगलीत 'विशालपर्व’ सुरू, भाजपाला अंतर्गत नाराजीचा फटका!

Sangli Lok Sabha BJP Vs Congress : राजकीय श्रेयवादात अडकलेल्या या निवडणुकीत आमदार विश्वजीत कदम हे किंगमेकर ठरले.
Sangli Lok Sabha Election
Sangli Lok Sabha ElectionSarkarnama

Sangli Lok Sabha Result and Vishal Patil : सांगली लोकसभा मतदारसंघात ‘विशालपर्व’मुळे कॉंग्रेसला दहा वर्षांनी पुन्हा विजय मिळाला. तर खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात असलेल्या नाराजीमुळे भाजपचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा भाजपकडून हिसकावून घेतला. राजकीय श्रेयवादात अडकलेल्या या निवडणुकीत आमदार विश्वजीत कदम हे किंगमेकर ठरले.

सांगली लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 लोकसभेच्या निवडणुकीतच्या मोदी(PM Modi) लाटेत कॉंग्रेसचे किल्ला ढासळला. संजयकाका पाटील यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली.

Sangli Lok Sabha Election
Vishal Patil: अब इस्लामपूर दूर नहीं; विशाल पाटील कुणाचा काटा काढणार

2019च्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा खासदार संजयकाका पाटील रिंगणात होते. तर कॉंग्रेसची ही जागा स्वाभिमानी विकास आघाडीला देण्यात आली. त्यामुळे विशाल पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. तर वंचित आघाडीकडून आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी निवडणूक लढवली. लोकसभेची निवडणूक तिरंगी झाली. यामध्ये खासदार संजयकाका पाटील विजयी झाले.

Sangli Lok Sabha Election
Vishwajeet Kadam : 'जंगल भी हमारा...राज भी हमारा' सांगलीत विश्वजित कदमांनी फोडली डरकाळी!

मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद घटत गेली, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेसला अधोगती लागली. भाजपला अच्छे दिन सुरू झाले. लोकसभेच्या 2014 व 2019 च्या निवडणुकीत झालेला पराभव दादा घराण्याच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे विशाल पाटील यांनी 2024 ची निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला. त्याची तयारी त्यांनी 2020 पासूनच सुरू केली होती.

मात्र उमेदवारी वाटपावरून पुन्हा महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला. शिवसेना (उबाठा) गटाने या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची परस्पर उमेदवारी जाहीर झाली. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या दोन सभा देखील झाल्या. अंतिम क्षणी अर्ज दाखल करूपर्यंत कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी संघर्ष केला. मात्र त्यांना यश आले नाही.

अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. आमदार विश्वजीत कदमांनी त्यांना पाठबळ दिले. तर दुसरीकडे संजयकाका पाटील तिसऱ्यांदा हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज होते. मात्र भाजपमध्ये संजयकाका पाटील यांच्याबद्दल नाराजी होती. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी संजयकाकांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. तरी देखील उमेदवारी मिळाली.

माजी आमदार विलासराव जगपात यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि ते थेट विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरले. तर शिवसेना (उबाठा) गटाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी छुप्या पध्दतीने विशाल पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे विशाल पाटील यांचे पारडे जड झाले.

निवडणुकीच्या पहिल्या दिवसांपासून विशाल पाटील यांच्या प्रचारात कॉंग्रेसचे कार्यकर्ते सक्रीय झाले. भाजपचा नाराज गट देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात छुपा पध्दतीने दिसून आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काही स्थानिक नेते, कार्यकर्ते देखील विशाल पाटील यांच्याबरोबर होते. आमदार विश्वजीत कदमांनी थेट कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विशाल पाटील यांच्या प्रचारात राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे विशाल पाटील यांच्या प्रचाराचे वारे सांगलीपासून जतपर्यंत चांगलेच घुमले होते.

प्रचारात संजयकाका पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर टीम सक्रीय केली होती. मात्र भाजप अंतर्गत असलेली नाराजी त्यांना भोवली आणि विशाल पाटील यांचा लाखाहून अधिक मतांनी विजय झाला. गेल्या दहा वर्षांपासून कॉंग्रेसचा भाजपने हिसकावून घेतलेला गड विशाल पाटील यांनी खेचून आणला. पुन्हा सांगली लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा केला. याची सर्व सूत्रे आ. विश्वजीत कदम यांनी हालवली.

काकांना दहा वर्षे डोक्यावर घेतले पण आता खेचले... -

सांगली लोकसभेची उमेदवारी ही सतत वसंतदादा घराण्यातच असते. त्यामुळे वसंतदादा घराण्यावर टीका होऊ लागली. दादा घराण्याचे कर्तृत्व काय? हा प्रचार देखील 2014 च्या निवडणुकीत झाला. त्यामध्ये असलेल्या मोदी लाटेमध्ये सांगलीच्या जनतेने संजयकाकांना डोक्यावर घेतले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी केले.

2019 च्या निवडणुकीत देखील काकांना साथ दिली. पण जनतेचा संपर्क कमी झाला, भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात घेतलेली भूमीका संजयकाका पाटील यांना अंगलट आली. जनतेने काकांना दोनवेळा डोक्यावर घेतले. पण या निवडणुकीत खाली खेचले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com