

Solapur, 23 June : आषाढी एकादशी सोहळा तयारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामांची आणि पालखी मार्गाची पाहणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती करणार आहेत. या पाहणी दौऱ्यानंतर पंढरपुरातच सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन प्रशासानाकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडून सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ व ठिकाण अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी होता, त्यामुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, ही सभा ३० जून रोजी होणार असल्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय आज (मंगळवार, ता. २३ जून) निर्णय होणार आहे.
तब्बल चार वर्षांच्या प्रशासक काळानंतर जिल्हा परिषदेवर लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. निवडणुकीनंतरची झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी झाली हेाती, तर दुसरी सभा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना प्रशासनाच्या कामकाजाची ओळख करून देण्यातच गेली.
येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यांना वारीच्या काळात विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आढावा विभागीय आयुक्तांनाही घेतला आहे. खुद्द जिल्हाधिकारी त्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, आता सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही आता पंढरपुरात घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे झेडपीची सर्वसाधारण सभा प्रथमच पंढरपुरात होत आहे. यापूर्वी पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथेही सर्वसाधारण सभा झाली होती. त्यानंतर शहरात प्रथमच झेडपीची सर्वसाधारण सभा होती.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विविध विषय समितींचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून पालखी मार्गावरील गावांतील विकासकामे, मुक्कामाची ठिकाणे यांची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून प्रथमच पंढरपुरात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.