रखडलेल्या जिहे-कटापुर जलसिंचन योजनेचे महेश शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

आज २६ वर्षांनंतर नेर तलावात पाणी आल्याने साताऱ्यात अतिदुष्काळी भाग समजला जाणाऱ्या खटावमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रखडलेल्या जिहे-कटापुर जलसिंचन योजनेचे महेश शिंदेंच्या हस्ते उद्घाटन
Published on
Updated on

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव (Khatav) तालूक्यातील जिहे-कटापुर जलसिंचन योजनेचे (Jihe-Katapur Irrigation Scheme) काम गेल्या २६ वर्षांपासून संत गतीने सुरु होते. मात्र आज अचानक भल्या पहाटे या योजनेचे उद्घाटन केले. या उद्घाटनामुळे कोरेगाव खटाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी एकप्रकारे आमदार शशिकांत शिंदेंना धक्काच दिल्याच्या चर्चा सध्या साताऱ्यात सुरु आहेत.

आज २६ वर्षांनंतर नेर तलावात पाणी आल्याने साताऱ्यात अतिदुष्काळी भाग समजला जाणाऱ्या खटावमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खटावमधील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या जलसिंचन योजनेचा फायदा मोठया प्रमाणार होणार असल्याने या भागातील शेतकरा या योजनेकडे डोळे लावून बसले होते. मात्र तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे स्वतः जलसंपदा मंत्री असूनही सुद्धा ही योजना पूर्ण होत नव्हती.

रखडलेल्या जिहे-कटापुर जलसिंचन योजनेचे महेश शिंदेंच्या हस्ते उद्घाटन
राज ठाकरेंनी स्वीकारले कांचन गिरींचे आमंत्रण, डिसेंबरमध्ये करणार अयोध्या दौरा

मात्र, आज भल्या पहाटे महेश शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जलसिंचन योजनेचे उद्घाटन केले आणि परिसरातील नागरिकांना आनंदाचा धक्काच दिला. दरम्यान, जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याची चाचणी काल रात्री यशस्वीरित्या पार पडली. कठापूरचे पाणी बोगद्याद्वारे नेर तलावातही पोहोचले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या नामकरणावरुन शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यात चकमकी होत असल्याने पाणी योजनेच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी निघणार, याकडे खटाव ग्रामस्थाचे लक्ष लागले होते.

मात्र अखेर आज कटापूरचे पाणी नेर तलावात पोहचल्यानंतर महेश शिंदे यांनी या योजनेचे उद्घाटनही केले. त्यासाठी महेश शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. " २४ वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या जिहे कटापूर योजनेचे पाणी दोन तपानंतर आज अखेर नेर धरणात पोहचले आणि खटाव तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले,'' अशा भावना यावेळी महेश शिंदेंनी व्यक्त केल्या.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी लक्ष्मणराव इनामदार याच्या जन्मशताब्दी निमित्त महेश शिंदे यांच्या नेतृत्वा जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या स्वप्नपूर्ती सोहळयाचे आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, '' दुष्काळग्रस्त माण-खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेमुळे पुढील दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com