इंदापूर टू सोलापूर प्रवासात माने, कोठे, शेख, चंदनशिवेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं ठरलं!

पालकमंत्री भरणे यांच्यासोबत माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे या सर्वांनी मिळून आज एकाच गाडीतून इंदापूर ते सोलापूर प्रवास केला.
Dilip Mane, Mahesh Kothe,Dilip Mane,Anand Chandanshive
Dilip Mane, Mahesh Kothe,Dilip Mane,Anand ChandanshiveSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) आज नेहमीप्रमाणे इंदापूर ते सोलापूरच्या प्रवासाला निघाले. आजच्या प्रवासात त्यांच्या गाडीत सोलापूर शहराच्या राजकारणातील खास व्यक्ती होत्या. पालकमंत्री भरणे यांच्यासोबत माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kote), माजी नगरसेवक तौफिक शेख (Tawfiq Sheikh), माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) या सर्वांनी मिळून आज एकाच गाडीतून इंदापूर ते सोलापूर प्रवास केला. निमित्त प्रवासाचे असले तरीही गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या (NCP) संपर्कात असलेल्या या नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे नियोजन झाल्याचे समजते. (Indapur to Solapur: Dilip Mane, Mahesh Kothe's joint journey with Dattatray Bharane)

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाले, मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रमही जाहीर झाला. त्यापूर्वी या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन वातावरण निर्मितीची संधी राष्ट्रवादी साधणार असल्याचे दिसते. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत एकामेकांच्या आमदारकीला अडसर ठरलेले दिलीप माने व महेश कोठे आज पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून एकाच गाडीत आले होते.

Dilip Mane, Mahesh Kothe,Dilip Mane,Anand Chandanshive
'संचालकांच्या नातेवाईकांच्या नावाने कर्ज काढलं; पण कारखाना चालवला'

महापालिकेच्या प्रभाग रचनेत माझा पॉलिटिकल गेम केला? या संशयानेही एकमेकांकडे पाहणारेही आज इंदापूर टू सोलापूर प्रवासात सोबत होते, हे विशेष. सोलापू्र महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करायचाच यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागली आहे. आपसातील मतभेद मिटवून नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्यात राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे.

Dilip Mane, Mahesh Kothe,Dilip Mane,Anand Chandanshive
फडणवीसांचा सोलापूर दौरा रद्द; मुंबईकडे रवाना; चर्चेला उधाण!

कोठेंमध्ये दिसतोय फरक

गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेले माजी महापौर महेश कोठे यांना लहान मोठ्या कामांसाठी इंदापूरपेक्षा (पालकमंत्री दत्तात्रेय भरणे) वडाळामार्गे (जिल्हाध्यक्ष बळिराम साठे) बारामतीच (पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार) सोयीची वाटायची. आज पालकमंत्री भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, म्हटल्यावर इंदापूर टू सोलापूर आणि सोलापुरात प्रत्येक ठिकाणी कोठे यांची उपस्थिती होती. मध्यंतरी बारामतीला गेलेल्या शिष्टमंडळातील कोठे आणि पालकमंत्र्यांचा प्रोटोकॉल समजलेले कोठे यातील फरक चाणाक्ष कार्यकर्त्यांना ठळकपणे दिसत होता.

Dilip Mane, Mahesh Kothe,Dilip Mane,Anand Chandanshive
महाविकास आघाडी झाल्यास आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार!

दक्षिणचा चेहरा माने

महापालिकेच्या सत्तेची भाजपची वाट ही शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून जाते. त्या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख यांना रोखण्यासाठी माजी महापौर महेश कोठे यांचा पर्याय आहे. सोलापूर दक्षिणमध्ये आमदार सुभाष देशमुख यांना रोखण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव राष्ट्रवादीने पुढे आणले आहे. महाविकास आघाडीच्या दक्षिणच्या आगामी राजकारणाचा चेहरा म्हणून माजी आमदार दिलीप माने असणार, हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. या दोन्ही मतदार संघात तगडी फिल्डिंग लावून राष्ट्रवादीने दोन्ही आमदार देशमुखांना रोखण्याची तयारी केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com