फडणवीसांचा सोलापूर दौरा रद्द; मुंबईकडे रवाना; चर्चेला उधाण!

देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द होण्यामागे राज्यसभा निवडणुकीतील काही घडामोड तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : लातूर (Latur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपला सोलापूर (solapur) दौरा रद्द केला आहे. पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून ते मुंबईकड रवाना झाले आहेत. फडणवीस यांनी अचानक दौरा रद्द करून ते मुंबईकडे (Mumbai) रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यांचा दौरा रद्द होण्यामागील कारण कळू शकलेले नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीची काही गणितं आहेत की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. (Devendra Fadnavis's Solapur tour canceled)

Devendra Fadnavis
गडकरींचे भाषण ऐकून मलाही एक साखर कारखाना काढावासा वाटतोय; पण... : ठाकरे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. ४ जून) सकाळपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमान्यू पवार यांनी केलेली विकास कामे पाहण्यासाठी फडणवीस हे आले होते. पवार यांनी केलेली विकास कामे पाहिल्यानंतर दुपारी त्यांनी आपला उर्वरीत दौरा रद्द केला आणि थेट मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या या दौरा रद्द होण्याने राजकीय चर्चा मात्र सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis
महाविकास आघाडी झाल्यास आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार!

औसा-लातूरचा दौरा करून देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते. सोलापुरात एका दैनिकाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार होते. तसेच, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ते मोजक्या लोकांशी संवाद साधण्याची शक्यता होती. मात्र, आता फडणवीस यांनी आपला सोलापूर दौरा रद्द केला आहे. फडणवीस आता सर्व कार्यक्रम आणि उर्वरीत दौरा रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Devendra Fadnavis
ED,CBI च्या माध्यमातून भाजपचा अपक्ष, छोट्या पक्षांवर दबाव; पण, राज्य सरकार आमचायं, हे लक्षात ठेवा!

दरम्यान, राज्यात राज्यसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोचला आहे. शिवसेना आणि भाजपकडून प्रत्येकी एक जागा अतिरिक्त लढवली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून घडामोडींना वेग आलेला आहे. विशेषतः अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून जोरात सुरू आहेत. फडणवीस यांचा दौरा रद्द होण्यामागे राज्यसभा निवडणुकीतील काही घडामोड तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com