आधी शिंदेंचा फोन अन् नंतर मातोश्रीवरून सूत्रे हलताच उत्तरच्या मैदानातून सय्यद यांची माघार

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मागील निवडणुकीत अस्लम सय्यद यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील मागील लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद (Aslam Sayyad) यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मतदारसंघाची ओळख नसतानाही त्यांनी त्यावेळी दीड लाखांच्या आसपास मते घेतली होती. त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या (Kolhapur North) मैदानातही उडी घेतली होती. यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, अखेर त्यांनी माघार घेतली आहे. थेट 'मातोश्री'वरून सूत्रे हलल्यानंतर सय्यद यांनी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.

सय्यद यांनी उत्तरच्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. सय्यद यांच्या मतविभाजन होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यांना थांबवण्यासाठी शिवसेनेची (Shivsena) यंत्रणा कामाला लागली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सय्यद यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. यानंतर सय्यद यांनी शिंदे यांच्या मध्यस्थीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी तातडीने कोल्हापुरात येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Uddhav Thackeray
पेट्रोल, डिझेलच्या दरात आठ दिवसांत सात वेळा वाढ; लिटरमागे 5 रुपयांनी महागलं

शिंदे यांनी फोनवर दिलेले निमंत्रण आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सय्यद यांनी माघार घेतली. तरी त्यांना शिवसेनेकडून कोणते आश्वासन देण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी दुसरीकडे संधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे समजते. सय्यद यांनी माघार घेतली असली तरी या निवडणुकीतील भूमिका त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही.

Uddhav Thackeray
काँग्रेसला धक्का! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने मारली बाजी

मागील लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून सय्यद हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांना या निवडणुकीत दीड लाखाच्या आसपास मते मिळाली होती. या मतदारसंघाची ओळख नसतानाही त्यांना एवढी मते मिळाली होती. यामुळे मतदारसंघाचे तत्कालीन खासदार राजू शेट्टी हे पराभूत झाले होते. सय्यद यांची उमेदवारी या मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या पथ्यावर पडली होती. आता कोल्हापूर उत्तरमध्ये सय्यद कुणाला पाठिंबा देतात याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com