

जनगणनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा जागा वाढण्याची शक्यता आहे.
वाढलेल्या लोकसंख्येमुळे मतदारसंघांची फेररचना होऊ शकते.
यामुळे नव्या उमेदवारांना राजकारणात संधी मिळणार आहे.
kolhapur News : केंद्र सरकारकडून यावर्षी जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या नवीन जनगणनेनुसार होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारे निवडणूक होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची आणखीन एक जागा वाढणार आहे. विधानसभेच्या तीन जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य किंवा शहरी भागात असणाऱ्या नगरसेवकांना फाळणी आमदार होण्याची संधी मिळणार आहे. शिवाय सध्याच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास संधी मिळणार आहे.
केंद्र सरकारने १ मेपासून जनगणनेची घोषणा केली असून, २०२९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. तत्पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील मतदार संघाची रचना ही 2009 मध्ये झाल्याने जिल्ह्यात 12 आमदार झाले. तर सांगरुळ व गडहिंग्लज या मतदार संघांची रचना होईल असे चित्र होते.
मात्र 2009 ला गडहिंग्लज मतदार संघ हा चंदगड आणि कागलला जोडला. तर सांगरूळ मतदार संघ हा करवीरमध्ये टाकण्यात आला. गेल्या १५ वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहे. ती २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान ३ जागा वाढण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार प्रत्येक अडीच लाख लोकसंख्येमागे एक आमदार असे सूत्र ठरत असल्याने जिल्ह्यात 13 मतदार होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार हे सूत्र वास्तवात आल्यास जिल्ह्यात 16 आणि तीन लाख लोकसंख्येला एक आमदार, असे सूत्र ठरवल्यास 13 आमदार संख्या होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे शहराला आणखीन एक आमदार मिळण्याची शक्यता आहे. तर लोकप्रिय नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याला या मतदारसंघाच्या फाळणीचा फायदा होण्याची शक्यता आहे.
1. जनगणनेचा निवडणुकांवर काय परिणाम होईल?
लोकसंख्येनुसार मतदारसंघांची फेररचना होऊ शकते.
2. कोल्हापुरात किती जागा वाढण्याची शक्यता आहे?
एक लोकसभा आणि तीन विधानसभा जागा वाढण्याची शक्यता आहे.
3. याचा फायदा कोणाला होईल?
नव्या आणि स्थानिक नेत्यांना निवडणुकीत संधी मिळेल.
4. हा बदल कधी लागू होईल?
जनगणना आणि त्यानंतरच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर.
5. मतदारसंघ बदलल्याने काय होईल?
राजकीय समीकरणे बदलतील आणि नवीन स्पर्धा निर्माण होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.