Kolhapur Politics : हसन मुश्रीफ, सतेज पाटलांसह दिग्गजांना 'केडीसीसी'चे दरवाजे कायमचे बंद, 'गोकुळ'मधून शड्डू ठोकणार!

Satej Patil & Hasan Mushrif KDCC : रिझर्व बँकेच्या नव्या नियमामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटलांसह अनेक दिग्गज अपात्र ठरत आहेत. त्यामुळे गोकूळमध्ये काही संचालक ताकद अजमवणार असल्याची माहिती आहे.
Satej Patil and Hasan Mushrif
Satej Patil and Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : भारतीय रिझर्व बँकेच्या नव्या नियमानुसार सहकारी बँकेत दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ असणारे संचालक आता निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत. बँकिंग कायद्याच्या दुरुस्तीमध्ये भारतीय रिझर्व बँकेकडून या नियमाला मान्यता दिल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना आणि खासदारांना निवडणूक लढवता येणार नाही.

बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 मध्ये जिल्हा बँकेच्या ज्या संचालकांना दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ संचालक म्हणून कार्यकाळ पाहिला आहे. अशा संचालकांना निवडणूक किंवा संचालक होण्यासाठी अपात्र असतील अशा नव्या नियमाला नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर अमृते यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना दिल्या आहेत.

'या' दिग्गजांचा पत्ता कट

दरम्यान याच वर्षी कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ हे जिल्हा बँकेवर संचालक आहेत. मागील 10 वर्षापासून त्यांनी या बँकेचे अध्यक्ष पद हाताळले आहे. यासह जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजू आवळे, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदर संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, संतोष पाटील हे देखील दहा वर्ष अधिक संचालक पदावर आहेत. त्यामुळे यंदा हे संचालक या नव्या नियमानुसार अपात्र ठरणार आहेत.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारण आणि राजकारणाशी आर्थिक नाडी म्हणून कोल्हापूर जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा या बँकेवर अवलंबून अनेकांना जिल्हा बँकेवर संचालक पद मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. मुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर संचालक पद भोगले आहे.

Satej Patil and Hasan Mushrif
Dhule Murder Case : धुळे जिल्ह्याला हादरवणाऱ्या खुनाचा निकाल, माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेप

कुटुंबातील व्यक्तीला संधी

मात्र नव्या नियमानुसार आता प्रस्थापितांना संधी मिळणार नसल्याने घरातील व्यक्तीला नातेवाईकांना संधी देण्याची व्यूहरचना आखली जात आहे. तर जे संचालक अपात्र ठरणार आहेत. त्यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा बँकेतील दोन ते तीन संचालक गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Satej Patil and Hasan Mushrif
Jalna bribery case : पंचायत समितीत भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धुमाकूळ; बिलं मंजूरीसाठी थेट गटविकास अधिकाऱ्यासमोरच पैशांचा व्यवहार, धक्कादायक VIDEO आला समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com