कोरेगाव : कृष्णानगर येथील मेडिकल कॉलेजची जागा मोकळी करण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले, ''प्रशासनाने कारवाई करून या भागातील लोकांना, गाळेधारकांना बेघर केले आहे. प्रतापसिंहनगरमधील शाळा पाडली आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक केली आहे. त्यांनी पुनर्वसन करण्याचा निर्णय दिला आहे.'' मात्र, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. केंद्र व राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
कोरेगाव मतदारसंघातील (Koregaon Constituency) रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत, हीच भावना असल्याचे नमूद करून आमदार महेश शिंदे म्हणाले, ''विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हिवरेचे सरपंच अजित खताळ यांच्यासह तळिये, किन्हई, जांब येथील शेतकऱ्यांची ही मागणी होती. त्या वेळी हा रस्ता करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण होत आहे. लॉकडाउनमुळे, तसेच काही पूर्तता राहिल्याने हा प्रस्ताव तीन वेळा वन विभागाकडून माघारी आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या खिंड रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.''
कोरेगाव मतदारसंघातील रस्ते मजबूत, व्यवस्थित झाले पाहिजेत, हीच आपली भावना असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. हिवरे, तळिये येथील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांची रस्त्याची मागणी आमदार शिंदे यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण केल्याचे अजित खताळ यांनी सांगितले. सुमारे ३५ वर्षांपूर्वी माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांनी या रस्त्याची मागणी केली होती. आमदार महेश शिंदे यांच्यामुळे या रस्त्याला मूर्त स्वरूप आल्यामुळे लोणंद, पुणे मार्केट जवळ आली असल्याचे हणमंतराव जगदाळे यांनी सांगितले.
कृष्णानगर येथील मेडिकल कॉलेजची जागा मोकळी करण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करत असल्याचे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, ''प्रशासनाने कारवाई करून या भागातील लोकांना, गाळेधारकांना बेघर केले आहे. प्रतापसिंहनगरमधील शाळा पाडली आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक केली आहे. त्यांनी पुनर्वसन करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मी हायकोर्टात पिटीशन दाखल करणार आहे आणि केंद्र व राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.