लोकप्रतिनिधींच्या बैठकीऐवजी गृहराज्यमंत्र्यांनी केली पोलिस ठाण्यांची अचानक तपासणी...

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai हे आपल्या हटके स्टाईलमुळे Style सर्वज्ञात आहेत. कोणत्याही पोलिस ठाण्यास Any Police station ते अचानक भेट Surprise Visit देऊन तपासणी करतात.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisolapur Reporter
Published on
Updated on

पंढरपूर : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते अकलूज येथे लोकप्रतिनिधींच्या बैठकीसाठी आले होते. पण, त्यांनी हेलिपॅडवरून थेट माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलिस ठाण्यास अचानक भेट देऊन तपासणी केली. तसेच तक्रारदारांशी थेट चर्चा केली. त्यांच्या या अचानक बदललेल्या दौऱ्यामुळे पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची मात्र, धावपळ उडाली.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आपल्या हटके स्टाईलमुळे सर्वज्ञात आहेत. कोणत्याही पोलिस ठाण्यास ते अचानक भेट देऊन तपासणी करतात. साताऱ्यात ही त्यांनी अशीच तपासणी केली होती. त्यामुळे पोलिस प्रशासनात त्यांची एक वेळी दहशत आहे. शुक्रवारी ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी गृहराज्यमंत्री देसाई हे लोकप्रतिनिधी व पोलिस अधिकाऱ्यांची अकलूज येथे बैठक घेणार होते. त्यासाठी ते आले होते.

Shambhuraj Desai
मंत्री शंभूराज देसाई धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला...

मात्र, गृहराज्यमंत्र्यांनी हेलिपॅडवरुन थेट माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या वेळापूर पोलिस ठाण्याला अचानक भेट दिली. या पोलिस स्थानकाची तपासणी करत आलेल्या तक्रारदारांशी थेट चर्चा केली. सावकारी सारख्या प्रकरणातील फिर्यादीची कैफियत त्यांनी जाणून घेतली.

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई म्हणतात, आगामी निवडणुकीतच विरोधकांना 'ट्रेलर' दाखवतो...

विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री यांच्या वेळापूर पोलिस ठाण्याच्या भेटीमुळे ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था आणि तेथील नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधाची एकप्रकारे तपासणीच झाली. गृहराज्यमंत्री लोकप्रतिनिधींच्या बैठकीऐवजी अचानक वेळापूर पोलिस ठाण्यात गेल्याने पोलिस अधीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com