IPS अंकित गोयल, समीर शेख यांना केंद्राचे विशेष पदक जाहीर

केंद्रीय गृहमंत्र्यांनी Central Home Minister जाहीर केलेल्या या विशेष ऑपरेशन पदकात तेलंगाणातील Telangana १३, पंजाबमधील Punjab १६, दिल्लीतील Delhi १९, जम्मू काश्मीर Jammu Kashmir राज्यातील चार तर महाराष्ट्रातील Maharahstra ११ पोलिस अधिकारी Police officer व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
IPS Samir Shaikh, Ankit Goyal
IPS Samir Shaikh, Ankit Goyalsarkarnama
Published on
Updated on

सातारा : पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल Ankit Goyal व साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख Samir Shaikh यांना केंद्रीय गृहविभागाचे पदक विशेष पदक जाहीर झाले आहे. त्यांनी गडचिरोलीत राबविलेल्या विशेष ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांचे २०२२ सालाचे विशेष ऑपरेशन पदक अकरा पोलिसांना जाहीर झाले आहे. यामध्ये दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोलीचे तत्कालिन आणि सध्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल आणि साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या विशेष ऑपरेशन पदकात तेलंगाणातील १३, पंजाबमधील १६, दिल्लीतील १९, जम्मू काश्मीर राज्यातील चार तर महाराष्ट्रातील ११ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आयपीएस अंकित गोयल, आयपीएस समीर शेख यांचा समावेश आहे.

IPS Samir Shaikh, Ankit Goyal
Satara : SP समीर शेख यांची दिवाळी हुतात्मा अधिकाऱ्याच्या आई-वडिलांसोबत...

तसेच पोलिस निरिक्षक संदीप मंडलिक, सहायक पोलिस निरिक्षक वैभव रणखंब, सुदर्शन काटकर, सहायक फौजदार रतिराम पोरेती, हवालदार रामसे उके, नाईक ललित राऊत, शहागीर शेख, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत बरसागडे, अमरदिप रामटेके या ११ पोलिसांचा समावेश आहे.

IPS Samir Shaikh, Ankit Goyal
रुबल अग्रवाल, अंकित गोयल यांना नव्या वर्षात पहिल्याच दिवशी मोठं 'गिफ्ट'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com